मनसे व्यापारी सेनेच्या वणी शहराध्यक्षपदी राकेश वैद्य
गेल्या 12 वर्षांपासून सामाजिक व कृषी क्षेत्रात कार्यरत
पुरुषोत्तम नवघरे, वणी: महाराष्ट्र नवनिर्माण व्यापारी सेनेच्या वणी शहराध्यक्षपदी युवा उद्योजक राकेश वैद्य यांची निवड करण्यात आली आहे. मनसेच्या व्यापारी सेनेचे अध्यक्ष यशवंत किल्लेदार यांनी ही महत्त्वपूर्ण नियुक्ती केली आहे. वणी शहरात नुकत्याच झालेल्या पक्ष प्रवेश व पद वितरण सोहळ्यात मनसे नेते राजू उंबरकर यांनी ही घोषणा केली. या निवडीबद्दल बोलताना उंबरकर म्हणाले की, “अनेक वर्षांपासून व्यवसाय क्षेत्रात कार्यरत असल्याने वैद्य यांचा जनसंपर्क दांडगा आहे, विशेषतः शेतकरी आणि व्यापारी वर्गात. ते व्यापाऱ्यांच्या समस्या आणि अडचणी मनसेच्या माध्यमातून सोडवण्याचा नक्कीच प्रयत्न करतील, असा विश्वास आहे.” राकेश वैद्य गेल्या 12 वर्षांपासून कृषी क्षेत्रात कार्यरत असून, त्यांचे कृषी केंद्र आहे. त्यांच्या या निवडीमुळे व्यापारी वर्गात उत्साहाचे वातावरण असून, सर्व स्तरांतून त्यांचे अभिनंदन होत आहे.

Comments are closed.