राखी लोहकरे यांचे प्रदीर्घ आजाराने निधन
नागपूर येथे घेतला अंतिम श्वास.... निधनाने परिसरात हळहळ
बहुगुणी डेस्क, वणी: स्थानिक रंगनाथ नगर येथील राखी सचिन लोहकरे (३८) यांचे प्रदीर्घ आजाराने निधन झाले. लोकमान्य टिळक महाविद्यालयाचे दिवंगत कर्मचारी त्र्यंबक वितोंडे यांच्या त्या कन्या होत्या. नागपुरला उपचारादरम्यान एक ऑक्टोबरला सायंकाळी सातच्या सुमारास यांची प्राणज्योत मालवली. वणीतील मोक्षधाम येथे आज त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पती, दोन मुलं, आई असा बराच आप्तपरिवार आहे. त्यांच्या अकाली जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
Comments are closed.