भक्तिगीतांच्या दोन सीडींचा लोकार्पण सोहळा बुधवारी

शैलेश आडपावार यांच्या ‘‘श्री रंगनाथ महिमा’’ आणि ‘‘श्री गजानन विजय’’ या दोन सीडी

विवेक तोटेवार, वणीः स्थानिक रंगनाथस्वामी देवस्थान येथे बुधवारी वैकुंठ महोत्सव साजरा होत आहे. या महोत्सवात शैलेश आडपावार यांनी गायलेल्या भक्तिगीतांच्या दोन सीडींचे लोकार्पण होत आहे. हा सोहळा बुधवारी सायंकाळी 7.30 वाजता रंगनाथ स्वामी देवस्थानात होईल. आडपावार यांच्या ‘‘श्री रंगनाथ महिमा’’ आणि ‘‘श्री गजानन विजय’’ या दोन सीडी आहेत.

श्री रंगनाथ महिमा ही सीडी स्वर्गीय पंडित गजेंद्र बापूजी पवार यांना समर्पित आहे. या सीडीसाठी नामदेवराव ससाने यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. यातील गीतरचना आणि संगीत अजित गोपाल खंदारे यांचे आहे. निर्मिती शीतल आडपावार यांची आहे. गायन शैलेश आडपवार आणि शर्वरी बाविस्कर यांनी केले. तबल्याची साथ अमोल बावणे ढोलकीची साथ अक्षय करसे तर ऑक्टोपॅडची साथ आकाश खंदारे यांची आहे.

संत गजानन महाराज यांच्या गीतांवर आधारित गजानन विजय या सीडीसाठी नागपूर येथील नारायणराव वानखडे यांचे विशेष सहकार्य लाभले. संगीत संयोजन अजित गोपाल खंदारे यांचे आहे. सहकलाकार पूजा देवाळकर देवयानी डोळस आणि शैलेश आडपावार आहेत.

वादक कलावंत अक्षय करसे, अमोल बावणे आणि आकाश खंदारे आहेत. गजानन विजय अभंगवाणीचे रचनाकार शेगाव येथील दासभार्गव आहेत. तर गायिका शर्वरी सतीश बाविस्कर आहेत. या कार्यक्रमाचे लोकार्पण संजय खाडे, विजय चोरडिया, विनय कोंडावार, माधव सरपटवार यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. तरी वणीकरांनी बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Comments are closed.