वणीत रंगपंचमीला रंगणार दीड शहाणे संमेलन

नाववंत हास्यकवी आणि हास्यसम्राट लावणार संमेलनाला हजेरी

0

विवेक तोटेवार, वणी: रंगपंचमीच्या निमित्ताने वणीतील शासकीय मैदानावर २१ मार्चला सायंकाळी ६ वाजता दिड शहाण्यांचे संमेलन भरवण्यात येणार आहे. यात हास्य कविंची मैफल आयोजित करण्यात आली आहे. यात सुप्रसिद्ध कवी व हास्यसम्राटांची उपस्थिती राहणार आहे. या कार्यक्रमाचे आयोजन वणीतील साहित्य व कलाप्रेमी मंडळींनी केले आहे. गेल्या 19 वर्षांपासून वणी रंगपंचमीच्या दिवशी हास्यसंमेलन, हास्यकविसंमेलन, मुर्ख संमेलन इत्यादी कार्यक्रमांची मेजवानी वणीकरांसाठी असते.

वणीत होणा-या दीड शहाणे संमेलनात मध्यप्रदेशातील सुप्रसिद्ध हास्यकवी लुठुरी लठ आगवा, प्राण प्रहरी गुणा यांच्यासह हास्यसम्राट व चला हवा येऊ द्या फेम किशोर बळी, दिनेश देहाती. प्रा. मनीष वाजपेयी इत्यादी कवी तसेच विनोदवीर सहभागी होणर आहे.

मुळात माणूस कितीही बुद्धिवान असला तरी त्याच्या आतमध्ये एक खट्याळ माणूस लपलेला असतो. अनेकदा बुद्धीवान मानसेही दीड शहाणेपणा करतातच. मात्र समाजात सभ्य, प्रतिष्ठावान, अशी बिरुदे मिळाल्याने माणसाला स्वत: मधील खट्याळपणा चारचौघात मांडता येत नसतो. रंगपंचमीसारखा सन माणसाला अमर्याद स्वातंत्र्य देतो. त्यामुळे या उत्सवाच्या पर्वावर एक मेकातील गुणदोष बाहेर काढता येऊ शकतात.

होळीच्या दिवशी पूर्वी अपशब्द वापरले जायचे. मूळात मानसशास्त्रीय दृष्ट्या मनातल्या कप्प्यात दडलेले हे वाईट शब्द बाहेर पाडण्याचा अनोखा प्रयोग आहे. यातून मनाचा मोकळेपणा संभव आहे. मात्र कालांतराने होळीच्या दिवशी अपशब्द वाहण्याच्या या परंपरेला काही टवाळखोरांनी बिभत्स रूप दिले. मात्र याला एक योग्य पर्याय म्हणून वणीत गेल्या काही वर्षांपासून निखळ विनोदाच्या माध्यमातून विविध मुर्ख संमेलन भरवण्याची प्रथा सुरू झाली आहे. या कार्यक्रमाला वणीकरांनी मोठ्या संख्येने हजेरी लावावी असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.