जितेंद्र कोठारी, वणी: खाऊचे आमिष दाखवून एका 6 वर्षीय चिमुकलीवर 32 वर्षाच्या नराधमाने अत्याचार केल्याची घटना झरी तालुक्यातील एका गावात घडली. सोमवार 25 ऑक्टो. रोजी ही घटना उघडकीस आली. दुष्कर्म पीडित मुलीच्या आईच्या तक्रारीवरून पाटण पोलिसांनी नराधमाच्या मुसक्या आवळल्या आहे.
प्राप्त माहितीनुसार पीडिता ही पाटण पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या एका गावातील रहिवाशी आहे. पीडितेच्या आईने सोमवारी घरात असलेला कापूस गाडीत भरण्याकरिता गावातील 4-5 जणांना बोलाविले होते. यात आरोपी अनिल मोरे हा देखील होता. त्याने इतर मजुरांसोबत गाडीत कापूस भरला.
गाडी भरल्यानंतर अनिल मोरे हा फिर्यादीच्या 6 वर्षाच्या मुलीला खाऊ देण्याच्या आमिष दाखवले व तिला सर्वांसमोर कडेवर उचलून गावातील पानटपरीच्या दिशेने नेले. तिथे आरोपीने चिमुकलीसोबत विकृत चाळे करत तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. अर्धा तासानंतर चिमुकली रडत रडत घरी आली. तेव्हा तिच्या आईने विचारले असता तिनं आपल्या सोबत घडलेली हकीकत सांगितली.
मुलीसोबत झालेल्या कुकृत्याची माहिती मिळताच तिच्या वडिलांनी आरोपी अनिल मोरे यास पकडून घरी आणले. तेव्हा चिमुकली आणखी घाबरली व तिनं यांनीच माझ्यासोबत गैरवर्तन केल्याचे सांगितले. तेव्हा आरोपी हा तिथून पळून गेला.
मुलीसोबत घडलेल्या किळसवाणी घटनेबाबत तिच्या आईने दिनांक 26 ऑक्टोबर रोजी पाटण पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली. त्यावरून पाटण पोलिसांनी आरोपी अनिल लालू मोरे (32) रा. ता. झरीजामणी विरुद्ध भादंविच्या कलम 376 (2) (j), 376 (AB), सहकलम 4,6 बाल लैंगिक अत्याचार अधिनियम अनव्ये गुन्हा दाखल केला.
नराधम आरोपीला बुधवार 27 ऑक्टोबर रोजी अटक करण्यात आली असून उद्या न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पूज्जलवार यांच्या मार्गदर्शनात एपीआय संगीता हेलोंडे करीत आहे.
हे देखील वाचा:
Comments are closed.