विवेक तोटेवार, वणी: रविवार 25 ऑक्टोबर रोजी आदिवासी समाजातर्फे आदिवासींचे दैवत राजा रावण यांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले यावेळी ध्वजारोहण कार्यक्रमही घेण्यात आला. हा कार्यक्रम वणीच्या भिमालपेंन देवस्थान येथे घेण्यात आला. यावेळी विविध आदिवासी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रस्तावित अशोक नागभीडकर तर यांनी केले. प्रास्ताविक करताना त्यांनी राजा रावण हे शिव उपासक असून ते आदिवासी समाजाचे आराध्य दैवत आहे. आदिवासी समाजासाठी रावण हे एक आदर्श पुरुष आहे. असे विचार मांडले. कार्यक्रमाचे संचालन शंकर किनाके यांनी केले. तर उपस्थितांचे आभार सुधाकर चांदेकर यांनी मानले. कार्यक्रमात राजा रावण यांचे पूजन व ध्वजारोहण करून अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून अभाआविपच्या प्रदेशध्यक्षा पुष्पाताई आत्राम, याच्यासह रमेश मडावी होते. यासह सुधाकर चांदेकर, संतोष चांदेकर, अशोक राजगडकर, पी डी आत्राम, डॉ. कृष्णा मडावी, कवडु कुळसंगे, अनिल गेडाम, संजय मडावी, वि बोरकर, नैताम, अलाम, भालचंद्र तोडकर यांच्यासह आदिवासी समाजबांधव उपस्थित होते.
(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)