घरमालक बाहेरगावी जाताच चोरट्यांनी मारला डल्ला

यवतमाळ येथून डॉग स्क्वॉड व फिंगर प्रिंट तज्ज्ञांना पाचारण

0

जितेंद्र कोठारी, वणी: येथील रवीनगर भागात राहणारे वेकोली कर्मचाऱ्याच्या बंद घरात चोरी झाल्याची घटना रविवार 22 आगस्ट रोजी उघडकीस आली. रोख रक्कम व सोन्याच्या दगिन्यासह चोरट्यानी 67 हजारचे ऐवज या घटनेत लांपास केल्याची तक्रार घरमालक रमेश गणपत भगत यांनी वणी पोलिस स्टेशनला दाखल केली. चोरट्यांच्या शोध घेण्यासाठी वणी पोलिसांनी सोमवारी यवतमाळ येथून फिंगर प्रिंट एक्स्पर्ट आणि डॉग स्क्वॉड पथकाला पाचारण केले. पथकाने भगत यांच्या घरातील विविध वस्तुवरील ठशांचे नमुने एकत्र केले.

प्राप्त माहितीनुसार रवीनगर येथे वास्तव्यास असलेले वेकिली कामगार रमेश गणपत भगत हे रक्षाबंधन सणासाठी कुटुंबासह वर्धा जिल्हयातील खापरी येथे जाऊन होते. दरम्यान घराला कुलूप लावून असल्याची संधि साधून अज्ञात चोरट्यानी शनिवारी मध्यरात्री डाव साधला. चोरट्यानी बेडरूममधील कपाटातून सोन्याचा मंगळसूत्र, डोरले, अंगठी व रोख 12 हजार असे एकूण 67 हजाराच्या सामानावर हात साफ केला.

रविवारी सकाळी भगत यांच्या घराचे कुलूप तुटून असल्याचे शेजारचे नागरिकांच्या लक्षात आले. त्यांनी याबाबत रमेश भगत यांना फोन करून सूचना दिली. माहिती मिळताच रमेश भगत तात्काळ वणी येथे पोहचले. घराची पाहणी करून त्यांनी कपाटातून 67 हजाराचा मुद्देमाल चोरी गेल्याची तक्रार पोलिस स्टेशनला नोंदविली. वणी पोलिसानी अज्ञात चोरट्याविरुद्द भादवी कलम 457, 380 अनव्ये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

हे देखील वाचा:

संध्याकाळी फिरायला गेलेल्या वृद्धास दुचाकीस्वाराने उडवले

चंद्रपूरला जाणा-या ट्रकला करणवाडीजवळ अपघात

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.