कुमारांचा लसींना धुवांधार प्रतिसाद, रेकॉर्डब्रेक लसीकरण

दोन दिवसात साडे तीन हजार कुमारांचे लसीकरण

जितेंद्र कोठारी, वणी: करोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत सोमवार 3 जानेवारीपासून 15 ते 18 वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणास सुरुवात झाली. या मोहिमेला कुमारांचा पहिल्याच दिवशी जोरदार प्रतिसाद देत लसीकरणासाठी गर्दी केली. वणी तालुक्यात 13 लसीकरण केंद्रांवर हे लसीकरण सुरू आहे. लसीकरण मोहिमेच्या पहिल्याच दिवशी वणी तालुक्यात सर्वात जास्त 1530 किशोरवयीन लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले. तर मंगळवार 4 जानेवारी रोजी रेकॉर्ड 1897 डोज लसीकरण करण्यात आले. शहरातील कल्याण मंडपम सह ग्रामीण रुग्णालय वणी येथे ही किशोरवयीन व्यक्तींना लस घेता येणार आहे.

आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार मंगळवारी वणी येथील एल.टी. कॉलेज परिसरात सुरू केंद्रावर 912 लाभार्थ्यांना कॉवेक्सीन लस देण्यात आली. त्याचप्रकारे कायर (118), घोन्सा (296), तेजापूर (28), पेटूर (31), मेंढोली (47), कुरई (155), कुर्ली (62), कळमना (83), नायगाव बु. (12), येनाडी (51), बेलोरा (48) आणि चिखलगाव केंद्रावर 54 जणांना लस देण्यात आली.

कोविड लसीकरण मोहिमेत वणी विभाग यवतमाळ जिल्ह्यात आघाडीवर आहे. कोविड-19 लसीकरण मोहीम यशस्वीरित्या राबविण्यासाठी आरोग्य विभागातील सर्व अधिकारी, कर्मचारी, नर्सेज, डाटाएन्ट्री ऑपरेटर अहोरात्र परिश्रम घेत आहे.

हे देखील वाचा:

खुशखबर: कापसाला सोन्याचा भाव, आज वणीत 9,500 रुपये दर

Comments are closed.