जाहीर सूचना: मालमत्तेच्या जाहीर लिलावात सहभागी न होण्याबाबत

पक्षकारांच्या ऍडव्होकेट द्वारा सूचना

0

जाहीर सूचना

मौजा. वणी येथील नगर पालिका हद्दीतील कोंडवाड्या जवळील गणेशपूर रोड स्थित ब्लॉक/शॉप क्रमांक 1, गोविंद कॉम्प्लेक्स, शिट नं 19 बी प्लॉट नं 255 आराजी 18.03 चौमी (194 चौ,फूट) ही मालमत्ता तसेच त्याच मिळकतीतील जिन्याच्या खालची आराजी 5.94 चौ.मी.(64 चौ. फूट) या दोन्ही मालमत्ता अनुक्रमे आमचे पक्षकार सौ. रुपाली रविंद्र येरणे व श्री रविंद्र दामोदर येरणे यांच्या मालकीची आहे.

सदर मालमत्तेचा बँक ऑफ महाराष्ट्र वणी बेकायदेशीररित्या लिलाव करू पाहत आहे. त्याबाबत आमच्या पक्षकाराने मा. जिल्हा न्यायालय पांढरकवडा (केळापूर) येथे बँक ऑफ महाराष्ट्र विरुद्ध दाखल केलेली नि. दि. अपील क्रमांक 33/2020 प्रलंबित आहे. तसेच ऋण वसुली प्राधिकरण नागपूर (डीआरटी) येथे देखील प्रकरण क्रमांक 735/2020 व 736/2020 दाखल केले आहे.

बँक ऑफ महाराष्ट्रला उपरोक्त आमच्या पक्षकाराच्या मिळकती लिलाव करण्याचा कोणताही अधिकार नाही. तरी या जाहीर नोटीस अन्वये सर्वांना सूचीत करण्यात येते की बँक ऑफ महाराष्ट्रने चालविलेल्या लिलाव प्रक्रियेत सहभाग घेतल्यास किंवा सदर मिळकती विकत घेतल्यास प्रलंबित न्यायालयीन प्रकरणातील निकालास आणि त्यातून उद्भवणा-या परिणामास कथित विकत घेणा-यास सामोरे जावे लागेल.

तरी उपरोक्त मालमत्तेबाबत बँक ऑफ महाराष्ट्रशी कोणताही व्यवहार करू नये.

आपला
ऍड. यशवंत राहाटे
नेताजी चौक, जत्रा रोड वणी
जिल्हा: यवतमाळ
मोबाईल, 9511885056 9822327747

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments
Loading...