वणीत लोढा हॉस्पिटलमध्ये रिलीफ फिजिओथेरपी क्लिनिकचे थाटात उदघाटन

आधुनिक मशिनीद्वारे फिजिओथेरपी उपचाराची सुविधा आता वणीत उपलब्ध

वणी बहुगुणी डेस्क : येथील प्रख्यात लोढा मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटलमध्ये ‘रिलीफ फिजिओथेरपी क्लिनिक’ चे शुभारंभ आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांचे हस्ते करण्यात आले. वणी परिसरात लकवा, सायटिका, स्लिप डिस्क, फ्रॅक्चर असलेल्या रुग्णांना आता शहरातच योग्य व आधुनिक पद्धतीने फिजिओथेरपी उपचार घेता येणार, असे प्रतिपादन यावेळी आमदार बोदकुरवार यांनी व्यक्त केले.

भौतिकोपचार म्हणजेच फिजोओथेरपी म्हटल्या जाणाऱ्या या महत्वाच्या उपचार पद्धतीचे कोणतेही दूःष्परिणाम शरीरावर होत नाहीत. पाठदुखी, मानदुखी, सांधेदुखी, मणक्याचे विकार, मज्जातंतूंचे आजार, प्रसूतीपूर्व व प्रसूतीनंतरचे फिजोओथेरपीचे व्यायाम स्त्रियांना दिले जातात. खेळाडूंना होणाऱ्या दुखापतीवर, वृद्धपकाळात होणारे आजार अशा निरनिराळ्या दुखण्यांमध्ये फिजिओथेरपी उपयुक्त ठरते. रिलीफ फिजिओथेरपी क्लिनिक मध्ये शॉर्ट व्हेव डायथर्मी, ट्रॅक्शन, आय.एफ.टी, अल्ट्रासाऊंडद्वारे उपचार करून रुग्णांना वेदनेपासून कायमची सुटका करण्यात येते.

अर्धांगवायू, पक्षाघात, चेहऱ्याच्या अर्ध्या भागाचा पॅरेलिसीस आदींबाबतचे उपचार या क्लिनिकमध्ये केले जातात. सेंटरमध्ये ट्रॅक्शन, स्टीम्युलेटर, इंटरफिरेंशियल करंट थेरपी (IFT), अल्ट्रासाऊंड, मसाजर गन, सिपीएम, टेन्स मशिन्स उपलब्ध आहेत. त्याचबरोबर रोप एक्सरसायझर, थेरा बॉल, सायकल, दोरीचक्र आदी व्यायामाची उपकरणे आहे. यांद्वारेही व्यायाम करून घेतले जातात. विशेष म्हणजे स्नायूंच्या वेदना असलेल्या रुग्णांवर ड्राय नीडलिंग पद्धतीने उपचार करून लवकर वेदनामुक्त केल्या जाते.

रिलीफ फिजिओथेरपी क्लिनिकचे शुभारंभ प्रसंगी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवारसह मनसे राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर, डॉ. महेंद्र लोढा, रिलीफ फिजिओथेरपी क्लिनिकचे संचालक डॉ. रौनक कोठारी, प्रवीण उंबरकर, नितीन उंबरकर, तुषार अतकरे, सुनील पाटील, जितेंद्र कोठारी, संजय पावडे, विलास पावडे उपस्थित होते. यावेळी डॉ. गणेश लिमजे, डॉ. विकास हेडाऊ, डॉ. विजय खापने, डॉ. भालचंद्र आवारी, डॉ. किशोर व्यवहारे, डॉ. सुबोध अग्रवाल, डॉ. सुरज चौधरी, डॉ. संदीप मानवटकर, डॉ. अंकुश बलकी, डॉ. अरुंधती मोडक उपरे, डॉ. प्रदीप ठाकरे, डॉ. शिरीष कुम्मरवार, विजय मुणोत, सुनील चिंडालीया व गणमान्य नागरिकांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या.

फिजिओथेरपी ही काळाची गरज
फिजीओथेरपी व्यायामाच्या उपचाराने कोणत्याही अपघातानंतर आलेल्या अपंगत्वावर मात करता येते. तसेच कोणत्याही पक्षघाताचा रुग्ण चांगला बरा होतो. त्याला अंथरुणाला खिळून राहण्याची आवश्यकता नसते. फिजोओथेरपीमुळे वेदनेपासून मुक्ती मिळवता येते. पण तंदुरुस्तीसाठी कायमस्वरूपी व्यायाम करणेही आवश्यक आहे.
डॉ. रौनक कोठारी, फिजिओथेरपिस्ट
रिलीफ फिजिओथेरपी क्लिनिक, वणी

Comments are closed.