वर्धा नदीवरील कालबाह्य पुलाच्या दुरुस्तीचे काम सुरू
धोनो-याजवळील पुलामुळे घुग्गुस व चंद्रपूर जाणा-यांना फायदा
जब्बार चीनी, वणी: यवतमाळ आणि चंद्रपूर जिल्ह्याला जोडणा-या वर्धा नदीवरील धानोरा पुलाचे एकशे चार बेरिंग बदलविण्या बरोबरच मायक्रोकाँक्रेटींग च्या कामाला सुरूवात करण्यात आली आहे. त्यामुळे येणा-या पावसाळयात वणीकरांना आता घुग्गुस मार्गे चंद्रपुर, बल्लारशहा व इतर ठिकाणी जाण्याकरीता त्रास सोसावा लागणार नाही.
घुग्घुस येथून जवळ वर्धा नदीच्या धानोरा पुलावर अनेक ठिकाणी सळाखी निघाल्या होत्या. या पुलावरून जाणा-यांना तारेवरची कसरत करावी लागत होती, या रस्त्यावरून दिवस-रात्र चंद्रपुर, कोरपना, यवतमाळ ते मुबंई पर्यंत छोटी मोठी वाहने जातात. या पुलावरील सळाखी बाहेर निघाल्यामुळे छोट्या -मोठ्या अपघाताच्या प्रमाणात वाढ झाली होती. तसेच वाहने पंचर व्हायची.
यामुळे पुलाचे बियेरींग रिपेरींग व काँक्रीट करण्या बाबतचे निवेदन ईबादुल हसन सिद्धीकी यांनी पिडब्लूडीला दिले होते. या निवेदनाची दखल घेऊन विभागाने वर्धा नदीच्या पुलाचे निरीक्षण केले आणि बेयरिंग रिपेरिंग व मॅक्रो कॉंक्रेटिग करण्याचा अहवाल तयार करून वरीष्ठांकडे सादर केला व नुकतेच या कामाचे टेंडर निघाले. या कामाचे टेन्डर पुणे येथील एम.बी. घारपुरे यांना तीन करोड दहा लाख सत्याहत्तर हजार नऊशे सदतीस रुपयास मिळाला असून या वर्धा नदीच्या धानोरा पुलाचे काम सुरु आहे.
पुलाचे आयुष्य 20 वर्षांनी वाढले – कार्यकारी अभियंता
वणी वरून घुग्गुस किंवा चंद्रपुर जातांना या पुलावरून जाणे म्हणजे तारेवरची कसरतच होती. पुलाचे एकशे चार बेरिंगबदलविण्या बरोबरच मायक्रोकाँक्रेटींग च्या कामाची सुरू करण्यात आली आहे. बेरिंग बदलविल्याने आता या पुलाचे आयुष्य 20 वर्षांनी वाढले आहे.अशी माहिती सा. बां. विभागा क्र.1 चे कार्यकारी अभियंता संतोषजाधव यांनी दिली.