सशस्त्र सेना दलात निवड झालेल्या युवक-युवतींचा प्रजासत्ताक दिनी गौरव

युवा चेतना क्लबचा पुढाकार, गजानन स्पोर्ट्स तर्फेही सन्मान

0

तालुका प्रतिनिधी, वणी: येथील युवा चेतना क्लब आणि ज्ञानदा मार्गदर्शन केंद्राच्या वतीने सेना दलात आणि शासकीय सेवेत निवड झालेल्या युवक – युवतींचा सत्कार मंगळवारी प्रजासत्ताक दिनी करण्यात आला. गुंजेचा मारोती देवस्थानात पार पडलेल्या कार्यक्रमाला मनसेचे नेते राजू उंबरकर, प्रा. दिलीप मालेकर, सामाजिक कार्यकर्ते जॉन पोन्नलवार, गजानन स्पोर्ट्सचे संचालक महेश पहापळे उपस्थित होते. 

वणीच्या शासकीय मैदानावर प्रा. दिलीप मालेकर यांच्या मार्गदर्शनाखाली युवक – युवती शारीरिक चाचणीचा सराव करतात. यामाध्यमातून आजपर्यंत बरेच युवक- युवतींना बीएसएफ, आर्मी, सीआरपीएफ आदी क्षेत्रात नोकरी मिळाली. त्याअनुषंगाने प्रजासत्ताक दिनी सत्काराचा कार्यक्रम आयोजित केला होता.

याप्रसंगी सशस्त्र सेना दलात आकाश पाटेकर, अक्षय कडू, रवी लिपटे, विवेक राजगडे, मोहसीन खान, अनिल माथनकर, नितीन यादव, नीलेश देठे, गणेश निब्रड, सूर्यकांत दातारकर, प्रतीक्षा कौरासे, जयश्री डवरे, आमरिन खान तर शासकीय सेवेत अधिकारी पदावर निवड झालेले जगदीश भगत, राहुल वरारकर यांचा स्वप्नपूर्ती पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.

गरजू विद्यार्थ्यांच्या मदतीला धावून येणारे मनसेचे राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर, प्रा. दिलीप मालेकर, जॉन पोन्नलवार, महेश पहापळे यांना सामाजिक न्याय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. संचालन संजय पेचे यांनी केले. वैभव ठाकरे यांनी आभार मानले. कार्यक्रमाला युवा चेतना क्लबच्या विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. याशिवाय शहरातील गजानन स्पोर्ट्सचे संचालक महेश पहापळे यांच्यातर्फेही सशस्त्र दलात निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा त्यांच्या प्रतिष्ठाणात भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला. 

 

हे देखील वाचा:

पैशाने कार्यकर्ते विकत घेता येत नाही: जयंत पाटील

 

Leave A Reply

Your email address will not be published.