उद्या वणीत देशभक्तीपर गितांचा कार्यक्रम

'एक शाम शहिदोंके नाम' कार्यक्रमातून सैनिकांना आदरांजली

0

निकेश जिलठे, वणी: वणीमध्ये 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिनांच्या औचित्यावर ‘एक शाम शहिदों के नाम’ या देशभक्तीपर गितांच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. हा कार्यक्रम संध्याकाळी पाच वाजता शिवाजी चौक वणी येथे होणार आहे. सै. अशफाक व मधूर सुगम संगीत संचाचे कलावंत हा कार्यक्रम सादर करणार आहेत. या कार्यक्रमात देशभक्तीपर गितांच्या माध्यमातून शहीद झालेल्या सैनिकांप्रती आदरांजली व्यक्त केली जाणार आहे. या कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व भूतपूर्व माजी सैनिक संघटना वणी शाखेतर्फे करण्यात येत आहे.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ख्वाजा बेग असणार आहे. तर कॅप्टन महादेव गाथाडे व स्वातंत्र्य सैनिक प्रल्हादजी रेभे यांची या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती राहणार आहे. यावेळी दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले शहीद विकास कुळमेथे यांच्या कुटुंबाचा सत्कार करण्यात येणार आहे.

‘वणी बहुगुणी’शी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस डॉ. महेंद्र लोढा म्हणाले की…

वणी ही शूरवीर योद्ध्यांची भूमी आहे. या परिसराने अनेक सैनिक आणि स्वातंत्र्य सेनानी देशाला दिले. शहीद विकास कुळमेथे सारख्या सैनिकाला देशाचे रक्षण करताना प्राणाची आहुती द्यावी लागली. आजही वणी, मारेगाव, झरी या भागातून गेलेले शेकडो सैनिक देशाच्या सीमेचे रक्षन करीत आहे. यांच्यामुळेच आज आपण मोकळेपणाने फिरू शकतोय. या सैनिकांविषयी तसेच परिसराने दिलेल्या स्वातंत्र्य सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन डॉ. राष्ट्रवादी काँग्रेसचे महेंद्र लोढा, जयसिंगजी गोहोकार तसेच भूतपूर्व माजी सैनिक संघटनेचे जाकीर अहेमद बेग, फाल्गुन जिड्डेवार यांनी केले आहे. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते व भूतपूर्व माजी सैनिक संघटनेचे सदस्य परिश्रम घेत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.