आरक्षण हक्क कृती समितीचे ‘आक्रोश आंदोलन’

शाहू महाराज जयंती निमित्त यवतमाळ येथील संविधान चौकात निर्दशन

0

जितेंद्र कोठारी, वणी: यवतमाळ येथील आरक्षण हक्क कृती समितीच्या वतीने राजश्री शाहू महाराज जयंती निमित्त आक्रोश आंदोलन करण्यात आले. शनिवार 26 जून रोजी सकाळी 11 वाजता स्थानिक संविधान चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ समितीच्या सदस्यांनी निर्दशन करून शासनाचे लक्ष वेधले.

महाराष्ट्र शासनाने घेतलेल्या पदोन्नतीच्या निर्णयाबाबत राज्यात असंतोष निर्माण झाला आहे. केंद्र सरकारच्या 2018 च्या आदेशाप्रमाणे न्यायालयाच्या अंतिम निर्णयाच्या अधीन राहून पदोन्नती देण्यात यावी. शासनाने घेतलेला पदोन्नती बाबतचा निर्णय मागे घ्यावा. त्याचप्रमाणे पूर्व अभ्यासक्रमासाठी परदेशी शिष्यवृत्ती योजना राबवावी. सरकारी कंपन्या, बँका, सरकारी विभागाचे खाजगीकरण व कंत्राटीकरण बंद करुन तेथे आरक्षण लागू करावे.

मंत्रिगट समितीच्या 2006 च्या शिफारशीप्रमाणे ओबीसींना पदोन्नतीतील आरक्षण तात्काळ लागू करावे. ओबीसींना स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरक्षणासाठी तात्काळ आयोग नेमावा. शेतकरी तीन जुलमी कायदे रद्द करावे. भटक्या, विमुक्त जाती ,जमाती व बारा बलुतेदार यांना क्रीमीलीयर मधून वगळावे. अशा विविध मागण्यांच्या संदर्भात आज जिल्हाधिकारी यवतमाळ यांना निवेदन देण्यात आले.

यावेळी प्रमोदिनी रामटेके, सुरज खोब्रागडे, अनिकेत मेश्राम, सुरज पाटील, सहदेव पवार, रमेश अतकर, पवन कुमार आत्राम, प्रभात कन्नाके, पंडित दिघाडे, निरंजन पेठे, जगन राठोड ,गणेश चव्हाण, जितेंद्र पाटील ,एम.के. कोडापे, गजेंद्र रामटेके, विजय गेडाम ,अभिमन्यू धुर्वे, प्रा. शांताराम चव्हाण, पल्लवी रामटेके, घनश्याम भारशंकर, प्रमोद कांबळे, इंजि. दीपक नगराळे,

अशोक वानखडे, सुरेश कन्नाके, प्रहलाद सिडाम, पी एस मेश्राम ,अमित भगत, गंगाधर राऊत, दीपक मनवर, इशू मोडवे, प्रेम राठोड, गुलाबराव कुडमिथे, पवन थोटे, सुभाष कुरसंगे, किशोर उईके, विलास काळे, सुनिता काळे ,विष्णू भीतकर, रवी श्रीरामे, विजय मालखडे, नारायण स्थूल, दीपक मनवर, नामदेव थुल, हरीश झाडे, अंकुश वाकडे इत्यादींची उपस्थिती होती.

Leave A Reply

Your email address will not be published.