मंदिरासमोरच अतिक्रमण करुन बांधले भोजनालय

गुरुवर्य कॉलोनीवासीयांची नगरपरिषदकडे तक्रार

जितेंद्र कोठारी, वणी: येथील यवतमाळ रोडवरील गजानन महाराज मंदिराच्या पुजाऱ्याने मंदिर समोर अतिक्रमण करून भोजनालय सुरु केल्याची तक्रार गुरुवर्य कॉलोनीवासीयांनी केली आहे. याबाबत मुख्याधिकारी न.प. वणीकडे निवेदन देण्यात आले आहे. मंदिरच्या अगदी समोर अतिक्रमण झाल्यामुळे मंदिरात येणाऱ्या भाविकांना ये-जा करण्यास अडचण होत आहे. तसेच मंदिराला लागूनच देशी दारुची दुकान असून मंदिर परिसरात दिवसभर मद्यपीचा गराडा असते.

निवेदनात म्हटले आहे की प्रभाग क्रमांक 1 गुरुवर्य कॉलॉनिवासीयांनी केलेल्या तक्रारीनुसार गजानन महाराज मंदिराचे पुजारी म्हणून आलेल्या कुटुंबांनी हळू हळू मंदिराच्या मागे अतिक्रमण करून आपले घर बांधले. त्यानंतर आता पुजाऱ्यानी मंदिरासमोरील ले आऊटच्या सर्व्हिस रोडवर टिनशेड बांधून भोजनालय सुरु केले आहे.

भोजनालयमुळे गजानन महाराजाचे मंदिर रस्त्यावरच्या लोकांना दिसेनासे झाले आहे. तसेच दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांसाठी फक्त 3 फुटाची गल्ली सोडण्यात आले आहे. तर बाजूलाच देशी दारुची दुकान असून दर्शनार्थ येणाऱ्या भाविकांना विशेषतः महिलांना नाहक त्रास सहन करावा लागतो. असा आरोप निवेदनातून केला आहे.

गुरुवर्य कॉलोनीवासीयांचे श्रद्धास्थान असलेले गजानन महाराज मंदिराच्या पुजाऱ्यानीच मंदिराभोवती अतिक्रमण करून जागा बळकावल्याने नागरिक संतप्त झाले आहे. त्यामुळे तब्बल 150 नागरिकांनी स्वाक्षरी करून मंदिर परिसर अतिक्रमणमुक्त केल्याची मागणी केली आहे. तसेच मंदिराला लागून असलेली दारु भट्टी हटविण्याची मागणीही नागरिकांनी केली आहे.

निवेदनाची प्रत आमदार, नगराध्यक्ष, विभागीय आयुक्त, अमरावती, जिल्हाधिकारी, उप विभागीय अधिकारी, तहसीलदार, दारुबंदी विभाग, अन्न व औषध प्रशासन यांनाही पाठविण्यात आली आहे. मंदिरासमोरील अतिक्रमण त्वरित न काढल्यास आंदोलनचा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे.

हे देखील वाचा:

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.