सेवानिवृत्त सुभेदार मेजर रामचंद्र कुबडे अनंतात विलीन

अल्पशा आजाराने झाले होते निधन

0

विवेक तोटेवार, वणी: सेवानिवृत्त सुभेदार मेजर रामचंद्र लक्ष्मण कुबडे यांचे मंगळवार 9 फेब्रुवारी रोजी दुपारी 1.30 वाजता त्यांच्या राहत्या घरी निधन झाले. ते 70 वर्षांचे होते व गुरूनगर येथे राहत होते. अल्पशा आजाराने त्यांचे निधन झाले. संध्याकाळी वणीतील मोक्षधाम येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. ते भारतीय लष्करातील माजी अधिकारी असून 1999 मध्ये ते सुभेदार मेजर या पदावरून निवृत्त झाले होते. गेल्या जवळपास एक महिन्यांपासून त्यांच्यावर नागपूर येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होता.

रामचंद्र यांचा जन्म तालुक्यातील कोलेरा या ठिकाणी 18 डिसेंबर 1951 रोजी झाला. त्यांचा चार भाऊ एक बहीण असा मोठा परिवार होता. वयाच्या 20 व्या वर्षी म्हणजे 1971 साली ते भारतीय लष्करात दाखल झाले. 1999 मध्ये भारतीय लष्करात सुभेदार मेजर या पदावरून ते सेवानिवृत्त झाले होते. सेवानिवृत्तीनंतर ते वणीत स्थायिक झाले होते.

त्यांना 11 जानेवारी रोजी आजार झाल्याने नागपूरच्या सेवन स्टार रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांची प्रकृती दिवसेंदिवस खराब होत गेली. शेवटी त्यांची अंतिम इच्छा घरी जाण्याची असल्याने मंगळवारी त्यांना घरी आणले गेले. मात्र काही वेळातच त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, सुना, नातवंड असा मोठा आप्तपरिवार आहे.

हे देखील वाचा:

जामनी जनावर मरी प्रकरण: उपचारासाठी दोन टीम तैनात

जुणोनी येथे कु-हाडीने वार करून पत्नीची हत्या

Leave A Reply

Your email address will not be published.