कोरोना संदर्भात खा. धानोरकरांची आढावा बैठक

सर्व विभागाच्या अधिका-यांना दिल्यात सूचना

0

जब्बार चीनी, वणी: कोरोना विषाणुच्या वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी व गरजु लोकांना अन्न धान्यांचं वाटप करण्याच्या नियोजना संदर्भात खासदार बाळु धानोरकर यांनी येथील महसूल कार्यालयात तालुक्यातील महसूल, आरोग्य विभागासह नगरपालिका व इतर विभागातील प्रमुख अधिका-यांची आढावा बैठक घेतली.

या बैठकीत गोरगरिबांना अन्नधान्याची अडचण होऊ नये म्हणून धान्याचे वितरण सुरळीत राहावे यासाठी पुरवठा विभागाने दक्ष राहण्याच्या सूचना देण्यात आल्या. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी शासनाने सर्वत्र संचारबंदी लागू केली आहे. याची पोलिसांनी काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याच्या सूचना देत यात कोणीही अडथळा आणण्याच्या प्रयत्न करीत असेल त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याच्या सूचना पोलीस अधिकायांना यावेळी देण्यात आल्या.

या बैठकीत विभाग निहाय सर्व अधिका-यांशी चर्चा करण्यात आली. या बैठकीत खासदार धानोरकर यांनी प्रामुख्याने गरजु लोकांना अन्न धान्य योग्य प्रकारे मिळण्यावर भर दिला. तसेच आरोग्याबाबत योग्य ती काळजी घेण्याच्या सूचना केल्यात.

मदतीला कुणी राजकीय स्टन्ट म्हणू नये – खा. धानोरकर 

लॉकडाउन वाढल्यामुळे अन्न धान्य चे नियोजन सातत्यानं होणे गरजेचे आहे. जे लोक इतर राज्यातुन या राज्यात कामासाटी आलेले आहे. जे इथले स्थानीक लोक आहेत त्यांची मोल मजुरी बुडालेली आहे. अशा लोकांना सुद्धा उदरनिर्वाहा साठी एक मदतीचा हात म्हणुन आम्ही सर्व प्रशासकीय यंत्रणेनी मागील सात आठ दिवसांपासून सातत्याने मिटींग घेउन ख-या गरजुची लिस्ट काढली व यांना देण्यासाठी जवळपास 5 हजार 500 अन्न धान्याच्या कीटा ही जमा झालेल्या आहेत. आजपासुन यांचे वाटप सुरू होत आहे. याला कुणी राजकीय स्टंटचा मुद्दा बनवीण्याचा प्रयत्न करू नये. असे ही ते म्हणाले

या बैठकीत एसडीओ डॉ. शरद जावळे, तहसीलदार शाम धनमने, न.प.मुख्याधिकारी संदीप बोरकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विकास कांबळे, पोलीस उपविभागीय अधिकारी सुशीलकुमार नायक, पोलीस निरीक्षक वैभव जाधव, माजी आमदार वामनराव कासावार, वसंत जिनींग चे अध्यक्ष एड देविदास काळे, आशिष कुळसंगे, तेजराज बोढे इत्यादी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.