रायझिंग डे सप्ताहात विविध कार्यक्रमांचे आयोजन
रफीक कनोजे, झरी: महाराष्ट्र पोलीस रायझिंग डे सप्ताहच्या निमित्ताने पोलीस कर्मचाऱ्यांसाठी २ ते ८ जानेवारी दरम्यान विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सप्ताहाच्या निमित्ताने प्रत्येक दिवशी शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थी व नागरिकांना पोलीस प्रशासनाबाबत व वाहतुकीच्या नियमांबद्दल माहिती व मार्गदर्शन करण्यात येत आहे. शनिवारला क्रीडा सामन्याचे आयोजन करण्यात आले. या क्रीडा सामन्याचे उदघाटन पोलीस उपनिरीक्षक नितीन चुलपारनी केले. या क्रीडा सामन्यात कबड्डी, व्हॉलीबॉलचे सामने खेळविल्या गेले. यात प्रशासनातील अधिकारी कर्मचारी, मुकूटबन युवक संघ, पत्रकार संघ व सामाजिक कार्यकर्ते आदी चमुंनी सहभाग घेतला.
रायझिंग डे सप्ताहच्या निमित्ताने मुकूटबन येथील आर्या इंग्लिश शाळा, आश्रम शाळा, आदर्श हायस्कूल व ज्युनियर कॉलेज येथे भेट देवून तसेच काही शाळांना ठाण्यात बोलावुन विद्यार्थी, शिक्षक व पालक यांना महिला सुरक्षा, वाहतुकीचे नियम याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. सोबतच बंदुक रायफल बद्दल माहिती देवुन, आनलाईन तक्रारींची प्रात्यक्षिक करुन दाखविली.
शनिवारी व्हॉलीबालचा प्रथम सामना मुकुटबन युवक संघ विरूध्द पोलिस संघ मुकुटबन यात खेळला गेला. या सामन्यांला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ठाणेदार गुलाबराव वाघ व दुय्यम ठाणेदार नितीन चुलपार यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस उपनिरीक्षक गोपाळ नेहारे, सहाय्यक पोलिस उप निरीक्षक सुधाकर मत्ते, सहाय्यक पोलिस उप निरीक्षक खुशाल सुरपाम , जमादार अशोक नैताम, कुळमेथे, मुकुटबन बीट जमादार मारोती टोंगे, ताजने , सागर मेश्राम, निरज पातुरकर, रमेश मस्के, संदिप सोयाम, कु. योगीता चटकी व ईतर कर्मचारी रेझिंग डे निमित्याने प्रती दिवशी परीश्रम घेतलें.