रफीक कनोजे, झरी: राज्यातील सर्वच मार्गांवरील रस्ते १५ डिसेंबरपर्यत खड्डेमुक्त करणार असल्याची घोषणा गणेश चतुर्थी पूर्वी राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली होती. १५ डिसेंबर पर्यंत मार्ग खड्डेमुक्त न झाल्यामुळे पुन्हा १५ दिवसाची मुदत वाढ देण्यात आली. मात्र तरी सुद्धा तालुक्यातील बहुतांश मार्गांवर आजही वाहने खड्डेमय रस्त्यातूनच मार्गस्थ होताना दिसून येत आहेत.
झरी तालुक्यातील रस्त्यांचे खड्डे ३१ डिसेंबर पुर्वी भरले जाईल. मुदत संपुन आठवडा उलटत आहे, मात्र अजुन ही झरी तालूक्यातील जिल्हा मार्गावरील रस्त्याच्या खड्ड्यात साधे मुरुम सुध्दा टाकण्यात आले नाही. झरी तालुक्यात रस्त्यांची अवस्था अत्यंत बिकट बनली असुन खड्ड्यात रस्ते की, रस्त्यात खड्डे, हेच कळेनासे झाले.
हिवरदरा ते कायर व पाटण ते बोरी राज्यमार्गावरील खड्डे आज ही कायम आहे. सा. बा. विभागाचे ग्रामीण भागाकडे अक्षरशः दुर्लक्ष केल्याचे दिसत असुन मुकुटबन वरुन पिंपरड, बहिलमपुर राजूर, राजूर, मांगली, तेजापुर, चिलई, आमलोन , खातेरा, माथार्जुन, डोंगरगाव, बंदिवाढोना व राज्यमार्गाला जोडनाऱ्या जिल्हामार्गाची अत्यंत बिकट असुन या रस्त्यात पडलेले खड्डे नागरिकांना डोकेदुखी व त्रास दायक ठरत आहे.
या रस्त्यावरुन दररोज ये-जा करणाऱ्यांचे जीव टांगनीला लागले असुन अपघातांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. निव्वळ जनतेच्या तोंडाला पाने पुसण्यचा एक कलमी कार्यक्रम सुरु असुन चंद्रकांत पाटलांनी कितीही दावे केले तरी या तालुक्यातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांची वस्तुस्थिती बदललेली नाही असेच दुर्दैवाने म्हणावे लागेल.