सुशील ओझा, झरी: मुकुटबन ते बोरी 29 किमी अंतराचे डांबरीकरण व दुरुस्तीचे काम गेल्या 6 ते 7 महिन्यापासून सुरू आहे. सदर रस्त्याचे काम 82 कोटींचे असून रोड दुरुस्तीच्या कामाकडे संमधीत विभाग, अभियंता व लोकप्रतिनिधीचे दुर्लक्ष होत असल्याने बहुतांश ठिकाणी नित्कृष्ट पद्धतीचे काम होत आहे असा आरोप जनतेकडून होत आहे.
मुकुटबन ते पाटण या मार्गावरील रायपूर फाट्या पासून तर पाटण गावाजवळील पुलापर्यंत 1800 मीटरच्या रस्त्याचे काम सुरू आहे. या कामात जुन्याच रोड वरील डांबर असलेल्या रोडवर गिट्टी टाकून रस्त्याचे काम सुरू आहे. रोडवरील डांबर न काढता गिट्टी व डांबर टाकून करीत असल्याने रस्ता नित्कृष्ट होत आहे असा आरोप परिसरातील नागरिक करीत आहे.
रायपूर फाट्याच्या आधी केलेल्या कामात जुन्या रोडवरील डांबर जेसीबीने काढण्यात आले व त्यानंतर त्याच्यावर गिट्टी व डांबरीकरण करण्यात आले. परंतु रायपूर ते पाटण जवळील पुलापर्यंत डांबर न काढता सरळ गिट्टी टाकून रस्त्याचे काम सुरू आहे. रायपूर ते पाटण नाल्यापर्यंत व अजून एका ठिकाणी अश्याच प्रकारचे काम असल्याची माहिती अभियंता आसुटकर यांनी सांगितले.
1800 मीटरचे जुने रोडकाम चांगले असल्याने सरळ गिट्टी टाकून बीबीएम करीत असल्याचे तसेच इस्तीमेटमध्ये असल्याचे सुद्धा अभियंता यांनी सांगितले. 29 किमी अंतराच्या कामात फक्त 1800 मीटरच्या कामातच जुन्या रोडवरील डांबर न काढता गिट्टी व डांबर टाकून बीबीएम करण्याचे टेंडर किंवा इस्तीमेट कसे? असा प्रश्न उपस्थित करून संशय व्यक्त होत आहे.
सदर कामाचे ठेकेदार व अभियंता विषयी तालुक्यातील समस्त जनता संशय व्यक्त करून संताप ही व्यक्त केल्या जात आहे. मुकुटबन ते बोरी हा 32 किमी अंतराचे मुख्य मार्ग असून हे तेलंगणा राज्याला जोडणारा मार्ग आहे. या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असते वाहतुकीमुळे हा रस्ता लवकर उखडून खराब होणार हे निश्चित. दर्जाहीन रस्त्याच्या कामाकडे कुणीही लक्ष देत नसल्याने शासनाची कोट्यवधींची निधी पाण्यात जाणार असल्याचे सुज्ञ नागरिक बोलत आहे.
वणी ते बोरी राज्यमार्गावरील रस्त्याच्या कामातील जुन्या मार्गातील डांबर न काढता फक्त गिट्टी व डांबर टाकून रस्त्याचे काम सुरू असल्याने आश्चर्य व्यक्त केल्या जात आहे. सदर रस्त्याच्या कामाकडे संमधीत अधिकारी किंवा लोकप्रतिनिधी लक्ष देणार काय असा प्रश्न तालुक्यातील जनता करीत आहे. तरी सदर रस्ता कामाची चौकशी करून दर्जा असलेले काम करून घ्यावे तसेच शासनाचा निधी वाया जाऊ नये अशी मागणी जनतेतून होत आहे.
हे देखील वाचा: