येनक येथे लोकवर्गणीतून पांदण रस्ता
विलास ताजने, वणी: “गाव करी ते राव न करी” अशी मराठीत म्हण आहे. अगदी या म्हणीला साजेसं काम वणी तालुक्यातील येनक ग्रामस्थांनी लोकसहभागातून करून एक नवा आदर्श निर्माण केला.
शेवाळा ते येनक हा पूर्वीपासूनचा पांदण रस्ता आहे. सदर शिवारातील शेतकऱ्यांना पावसाळ्यात शेतमालाची, शेती अवजारांची वाहतूक करणे शक्य नसते. म्हणून ग्रामस्थांनी वेळोवेळी लोकप्रतिनिधीना सदर समस्येची जाण करून दिली. मात्र पोकळ आश्वासनाशिवाय पदरी काहीच पडलं नाही. अखेरीस नेहमीच्या त्रासाला कंटाळून शेतकऱ्यांनीच एक किमीचा पांदण रस्ता तयार करण्याचे ठरवले.
पाहता पाहता सढळ हाताने लोकवर्गणी गोळा झाली. अन रस्त्याचे काम सुरू झाले. यासाठी नत्थुजी पंडिले, रणजित बोन्डे, खुशाल गारघाटे, पुरुषोत्तम मांडवकर, संजय पंडिले, शंकर खामनकर, विनायक पंडिले, विठ्ठल गारघाटे, जगन्नाथ पंडिले, रवींद्र बोन्डे, श्रीरंग घोरपडे, सुधाकर गारघाटे, विलास डाखरे, विठ्ठल खामनकर, संजय आत्राम यांनी पुढाकार घेतला.