मार्डी रोडवर घडला थरार… फिल्मीस्टाईल 3 लाखांची रोडक लंपास

दुचाकीला लाथ मारून दरोडा, 3 दरोडेखोरांविरोधात गुन्हा दाखल

बहुगुणी डेस्क, वणी: मार्डी रोडवर सोमवारी रात्री थरारक घटना घडली. दुचाकीला लाथ मारून दुचाकीवर ठेवलेल्या बॅगमधल्या 3 लाखांच्या रकमेवर दरोडा टाकण्यात आला. मछिंद्रा ते बाम्बर्डा दरम्यान रात्री 9 वाजता ही घटना घडली. या प्रकरणी अज्ञात दरोडेखोरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. (NEW UPDATE– या घटनेतील बॅग पोलिसांच्या हाती लागली आहे. लिंकवर क्लिक करून अपडेटेड बातमी वाचा)

 तक्रारीनुसार, फिर्यादी चेतन विजय चिंचोलकर (25) हे मारेगाव तालुक्यातील चोपण येथील रहिवासी आहे. त्यांना जमीन खरेदी करायची होती. त्यामुळे सोमवारी दिनांक 6 एप्रिल रोजी वणी येथे दुचाकीने पैसे उसणे घेण्याकरीता आले होते. त्यांनी पैसे व कागदपत्र एका कापडी बॅगमध्ये ठेवले व सदर बॅग त्यांनी दुचाकीच्या पेट्रोल टंकीवर ठेवली. रात्री 3 लाख रुपये घेऊन  नांदेपेरा-मार्डी मार्गे गावी चोपण येथे परतत होते. मात्र त्यांना माहिती नव्हते की त्यांचा कुणी तरी दुचाकीने पाठलाग करीत आहे.  

रात्री पावने 9 ते 9 वाजताच्या दरम्यान त्याची दुचाकी मछिंद्रा ते बाम्बर्डा येथे असताना त्यांच्या दुचाकीजवळ ट्रीपलसीट एक बाईक आली. बाईक चालकाने चेतन यांच्या दुचाकीजवळ बाईक घेतली. मागे बसलेल्या एकाने चेतन यांच्या दुचाकीला लाथ मारली. त्यामुळे त्यांचा तोल गेला. त्याच वेळी एकाने शिताफिने चेतन यांच्या दुचाकीच्या पेट्रोल टँकवर ठेवलेली पैशाची बॅग घेतली. हे सर्व एका क्षणात झाले.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

दुचाकीला लाथ मारल्याने चेतन यांचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले व त्यांची दुचाकी रस्त्याच्या कडेला पडली. दरम्यान चोरटे पैशाची बॅग घेऊन मार्डीच्या दिशेने धुमस्टाईल पसार झाले. या बॅगमध्ये रोकड सह महत्त्वाचे कागदपत्र देखील होते. चेतन यांनी तात्काळ मारेगाव पोलीस स्टेशन गाठत याबाबत तक्रार दिली. पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात बीएनएसच्या कलम 309 (4) नुसार गुन्हा दाखल केला.   

NEWS UPDATE- दरोड्याची बॅग लागली पोलिसांच्या हाती !

Comments are closed.