बहुगुणी डेस्क, वणी: दिवसेंदिवस माणसाचा संयम सुटत चालला आहे. समाजातले वाद शेजाऱ्यांसोबत सुरू झाले. शेजाऱ्यांचे वाद घरात सुरू झाले. आताच्या अपार्टमेंट कल्चरमध्ये बरीच यांत्रिकता आली आहे. पूर्वीसारखे शेजाऱ्यांसोबतचे सौख्याचे संबंध राहिले नाहीत. आणि जवळपास सगळेच आक्रमक व्हायला लागलेत.
अशीच एक घटना शहरातील रवीनगरमधल्या एका अपार्टमेंटमध्ये घडली. तिथे खाजगी नोकरी करणारे फिर्यादी विलीन वामनराव औझे (47) राहतात. शुक्रवार दिनांक 28 फेब्रुवारीला ते नेहमीप्रमाणे झाडझूड करीत होते. नंतर त्यांनी सकाळी 8.00 वाजताच्या सुमारास तो कचरा फेकला. ही बाब त्याच अपार्टमेंटमधील आरोपी अभय विठ्ठल होले (40) यांना खटकली.
सुरुवात शाब्दिक वादातून झाली. आरोपीने फिर्यादीला शिवीगाळ करणे सुरू केले. नंतर हा वाद हातघाईवर आला. आरोपीने फिर्यादीला थापडा आणि बुक्क्या मारायला सुरुवात केली. मग अचानक हा आरोपी घरात गेला. येताना त्याने घरून स्टिलचा रॉड आणला. आणि पुन्हा फिर्यादीस मारणे सुरू केले.
तो रॉड फिर्यादीस लागून हाताची तर्जनी म्हणजेच एक बोट मोडले. याही उपर आरोपीने फिर्यादीस एखाद्या दिवशी पाहून घेतो अशी धमकी दिली. फिर्यादीच्या तक्रारीवरून वणी पोलीस ठाण्यात कलम 118(1), 352,3 51(2), (3) BNS अन्वये गुन्हा दाखल झाला. पुढील तपास ASI सुरेंद्र टोंगे करीत आहेत.
Comments are closed.