गडचिरोलीत रोकडे ज्वेलर्सचे भव्य दालन; अभिनेत्री शिल्पा शिंदे उपस्थितीने लावणार चार चाँद!
अभिनेत्री शिल्पा शिंदे यांच्या उपस्थितीत उद्घाटन; ग्राहकांसाठी विशेष सवलती, स्थानिकांना रोजगाराची संधी
पुरुषोत्तम नवघरे, वणी : पाच पिढ्यांचा आणि १२४ वर्षांहून अधिक काळाचा सुवर्ण वारसा जपणाऱ्या रोकडे ज्वेलर्स या नामांकित दागिने ब्रँडचे भव्य शोरूम गडचिरोली शहरात सुरू होणार आहे.
चंद्रपूर-मूल मार्गावर उभारण्यात आलेल्या या नव्या दालनामुळे गडचिरोलीसह परिसरातील ग्राहकांना सोन्याचे, हिऱ्यांचे, पोलकी, कुंदन, वधूंसाठीचे आकर्षक दागिने आणि चांदीच्या दागिन्यांचे विविध संग्रह एकाच छताखाली उपलब्ध होणार आहेत. या भव्य शोरूमच्या उद्घाटन सोहळ्याला लोकप्रिय अभिनेत्री आणि ‘बिग बॉस ११’ची विजेती शिल्पा शिंदे विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार असल्याने सोहळ्याची रंगत वाढणार आहे. विशेष म्हणजे, या नव्या दालनामुळे स्थानिक युवक-युवतींसाठी रोजगाराचे नवे दालनही खुले झाले आहे. रोकडे ज्वेलर्सचे व्यवस्थापकीय संचालक राजेश भैयाजी रोकडे यांनी पत्रकार परिषदेत शोरूमच्या शुभारंभाची माहिती दिली.
यावेळी प्रमोटर भैयाजी रोकडे, वंदना रोकडे, अनामिका रोकडे, संस्कृती रोकडे तसेच संचालक सारंग रोकडे आणि पारस रोकडे उपस्थित होते. कंपनीच्या विस्ताराचा भाग म्हणून गडचिरोलीत उभारण्यात आलेले हे दालन ग्राहकांना आधुनिक खरेदीचा अनुभव देण्यासोबतच स्थानिक पातळीवर रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणार आहे. मोठ्या व्यावसायिक आस्थापनेच्या आगमनामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. रोकडे ज्वेलर्सच्या नव्या शोरूममध्ये काम करण्यासाठी गडचिरोलीतील युवक-युवतींची निवड करण्यात आली असून, त्यांना ग्राहकसेवा आणि दागिन्यांच्या विक्रीसंदर्भातील आवश्यक प्रशिक्षण देण्यात आले आहे. निवड झालेल्या कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण नागपूर येथील रोकडे ज्वेलर्सच्या शोरूममध्ये पूर्ण करण्यात आले. या प्रशिक्षणादरम्यान शोरूममधील कामकाजाची पद्धत, ग्राहकांशी संवाद साधण्याचे कौशल्य, दागिन्यांची माहिती, विक्री प्रक्रिया आणि ग्राहकांना उत्तम सेवा देण्याच्या विविध बाबींचे मार्गदर्शन करण्यात आले.
प्रशिक्षण पूर्ण केलेली ही स्थानिक टीम आता गडचिरोलीतील नव्या शोरूममध्ये ग्राहकांच्या सेवेसाठी सज्ज झाली आहे. बाहेरील शहरांतील कर्मचाऱ्यांवर अवलंबून न राहता स्थानिक युवक-युवतींना प्रशिक्षण देऊन रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याच्या या उपक्रमामुळे तरुणांना कामाचा अनुभव मिळण्याबरोबरच त्यांच्या कौशल्यविकासालाही हातभार लागणार आहे. जिल्ह्यात मोठ्या व्यावसायिक दालनांची वाढ होत असताना स्थानिकांना रोजगारात प्राधान्य मिळणे ही सकारात्मक बाब मानली जात आहे. ‘भाभीजी घर पर हैं!’ या लोकप्रिय मालिकेतील भूमिकेमुळे घराघरांत पोहोचलेल्या आणि ‘बिग बॉस ११’ या रिअॅलिटी शोची विजेती ठरलेल्या अभिनेत्री शिल्पा शिंदे या उद्घाटन सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या उपस्थितीमुळे या भव्य सोहळ्याला विशेष ग्लॅमर प्राप्त होणार आहे. दरम्यान, प्रसिद्ध चित्रपट अभिनेते रितेश देशमुख आणि अभिनेत्री जेनेलिया देशमुख हे रोकडे ज्वेलर्सचे अधिकृत ब्रँड अॅम्बेसेडर आहेत. महाराष्ट्राचे लाडके ‘भाऊ आणि वहिनी’ म्हणून लोकप्रिय असलेली ही जोडी विश्वास, कौटुंबिक मूल्ये आणि आधुनिकतेचे प्रतीक मानली जाते.
सोने, हिरे, पोलकी आणि कुंदनचे आकर्षक संग्रह…
नव्या शोरूममध्ये २२ कॅरेट हॉलमार्क सोन्याच्या दागिन्यांसह १८ कॅरेट पिवळ्या सोन्याचे हलके आणि आधुनिक डिझाइन उपलब्ध होणार आहेत. याशिवाय हिऱ्यांचे दागिने, पोलकी, कुंदन, वधूंसाठीचे खास दागिने आणि चांदीच्या अलंकारांचे विविध संग्रह ग्राहकांना पाहता येणार आहेत. दैनंदिन वापरासाठी हलके दागिने खरेदी करू इच्छिणाऱ्या ग्राहकांपासून ते विवाहसोहळ्यासाठी पारंपरिक आणि आकर्षक दागिन्यांचा शोध घेणाऱ्या ग्राहकांपर्यंत सर्वांसाठी विविध पर्याय उपलब्ध करून देण्याचा कंपनीचा प्रयत्न आहे.
ग्राहकांसाठी सहा नवीन खरेदी योजना…
ग्राहकांना भविष्यातील दागिने खरेदीचे नियोजन करता यावे, यासाठी कंपनीने सहा नवीन योजना सुरू केल्या आहेत. यामध्ये गोल्ड बायिंग प्लॅन, डिजिटल गोल्ड प्लॅन, मासिक दागिने हप्ता योजना, गोल्ड एक्स्चेंज अँड अपग्रेड प्लॅन, भविष्यातील विवाह व विशेष प्रसंगांसाठीची योजना आणि डायमंड-सिल्व्हर स्पेशल प्लॅन यांचा समावेश आहे. राशिरत्न खरेदीसाठी २१ दिवसांचा चाचणी कालावधी आणि अटींच्या अधीन राहून पैसे परत मिळवण्याची सुविधा असल्याचेही कंपनीने नमूद केले आहे.
उद्घाटनानिमित्त घडणावळीवर विशेष सवलती…
शोरूमच्या उद्घाटनानिमित्त ग्राहकांसाठी विशेष ऑफर्स जाहीर करण्यात आल्या आहेत. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, सोन्या-चांदीच्या दागिन्यांच्या घडणावळीवर ५० टक्के सूट, तर हिऱ्यांच्या दागिन्यांच्या घडणावळीवर १०० टक्के सूट देण्यात येणार आहे. तसेच प्रत्येक खरेदीवर पुढील खरेदीसाठी घडणावळीवर २५ टक्के सवलत मिळवून देणारे व्हाउचर देण्याची योजनाही जाहीर करण्यात आली आहे. २२ कॅरेट सोन्याच्या दागिन्यांची घडणावळ पाच टक्क्यांपासून सुरू असल्याचे कंपनीने सांगितले. हिऱ्यांच्या दागिन्यांची सुरुवातीची किंमत १९ हजार ९९९ रुपये असल्याचाही कंपनीचा दावा आहे. या ऑफर्ससाठी लागू असलेल्या अटी, पात्र दागिन्यांचे प्रकार आणि सवलतींचा कालावधी ग्राहकांनी खरेदीपूर्वी तपासावा, असे पत्रकार परीषदेत सांगण्यात आले.
ग्राहकांसाठी सहा नवीन खरेदी योजना…
ग्राहकांना भविष्यातील दागिने खरेदीचे नियोजन करता यावे, यासाठी कंपनीने सहा नवीन योजना सुरू केल्या आहेत. यामध्ये गोल्ड बायिंग प्लॅन, डिजिटल गोल्ड प्लॅन, मासिक दागिने हप्ता योजना, गोल्ड एक्स्चेंज अँड अपग्रेड प्लॅन, भविष्यातील विवाह व विशेष प्रसंगांसाठीची योजना आणि डायमंड-सिल्व्हर स्पेशल प्लॅन यांचा समावेश आहे. राशिरत्न खरेदीसाठी २१ दिवसांचा चाचणी कालावधी आणि अटींच्या अधीन राहून पैसे परत मिळवण्याची सुविधा असल्याचेही कंपनीने नमूद केले आहे.
पारदर्शक खरेदी आणि सुरक्षिततेवर भर…
ग्राहकांना दागिन्यांची शुद्धता तपासता यावी, यासाठी अत्याधुनिक कॅरेटमीटर यंत्रांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. जुन्या सोन्याच्या वितळवण्याच्या प्रक्रियेचे चित्रीकरण, खरेदीच्या तपशिलांसह करपावती, स्वतंत्र पार्किंग आणि आवश्यक सुरक्षा व्यवस्था यांवरही भर देण्यात आला आहे.
गडचिरोलीनंतर यवतमाळमध्येही विस्तार..
रोकडे ज्वेलर्सची नागपूर, भंडारा, गोंदिया आणि चंद्रपूर येथे मिळून दहा शोरूम सुरू असल्याची माहिती कंपनीने दिली. गडचिरोलीतील नवे दालन हे कंपनीचे अकरावे शोरूम ठरणार आहे. आगामी तीन महिन्यांत यवतमाळ येथे बारावे शोरूम सुरू करण्याची योजना आहे. त्यानंतर अमरावती, नाशिक, पुणे, मुंबईसह महाराष्ट्रातील अन्य शहरांमध्ये, तसेच मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये विस्तार करण्याचा कंपनीचा मानस आहे. भविष्यात आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतही प्रवेश करण्याची योजना असल्याचे व्यवस्थापनाने सांगितले.
परंपरेसोबत स्थानिक विकासालाही चालना…
१२४ वर्षांहून अधिक काळाचा वारसा, आधुनिक दागिन्यांचे विविध संग्रह, ग्राहकांसाठीच्या खरेदी योजना आणि स्थानिक युवक-युवतींना रोजगाराची संधी या वैशिष्ट्यांमुळे रोकडे ज्वेलर्सचे गडचिरोलीतील नवे दालन महत्त्वाचे ठरणार आहे. विशेषतः नागपुरात प्रशिक्षण घेऊन आता गडचिरोलीत सेवा देण्यासाठी सज्ज झालेली स्थानिक टीम ही या नव्या उपक्रमाची जमेची बाजू आहे. व्यावसायिक विस्तारासोबत स्थानिक मनुष्यबळाचा विकास आणि रोजगारनिर्मितीला चालना मिळाल्यास जिल्ह्याच्या आर्थिक प्रगतीला हातभार लागू शकतो. त्यामुळे रोकडे ज्वेलर्सच्या नव्या दालनाकडे केवळ दागिन्यांच्या खरेदीचे केंद्र म्हणून नव्हे, तर स्थानिक युवक-युवतींसाठी नव्या संधींचे दालन म्हणूनही पाहिले जात आहे.
—————————————–


Comments are closed.