बहुगुणी डेस्क, वणी: महाराष्ट्रातील कोल्हापूर- सांगली मध्ये निसर्गाचा प्रकोप झाल्यामुळें या परिसरातील अनेक गावांना पुराचा जबरदस्त तडाखा बसला आहे. यातील संकटग्रस्त कुटुंबाना मदतीचा हात देण्यासाठी रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणी व व्यापारी असोसिएशन वणी यांनी वणीकरांना साद घातली. याला वणीकरांनी पाच दिवसात प्रचंड प्रतिसाद दिला.
या जीवनावश्यक वस्तू एका मोठ्या ट्रक मध्ये टाकून येथील टिळक चौकातून रवाना करण्यात आले. या प्रसंगी वणीकरांची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात अध्यक्षस्थानी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, प्रमुख अतिथी म्हणून उपविभागीय अधिकारी डॉ. शरद जावळे, तहसीलदार श्याम धनमाणे, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष राकेश खुराणा, रोटरी क्लबचे निकेत गुप्ता, राष्ट्रवादीचे डॉ. महेंद्र लोढा, प्रा. दिलीप मालेकर, सामाजिक कार्यकर्ते संजय देरकर, उपस्थित होते. या अतिथीसोबत माजी नगराध्यक्षा साधना गोहोकार, स्वर्णलीलाचे किशन जैन, गजानन कासावार, यांनी वणीकराप्रति कृतज्ञता व्यक्त करून रोटरी क्लब व व्यापारी असिसिएशनने यापुढेही अशा सामाजिक कार्यात पुढाकार घ्यावा असे आवाहन केले.
वणी, मारेगाव,व झरी तालुक्यातील सामाजिक संस्था, व्यापारी संस्था, शैक्षणिक, सांस्कृतिक, व धार्मिक संस्था व दानशूर व्यक्तीकडून सढळ हाताने मिळालेल्या मदतीमुळे 13 लाख रुपयांचे साडे सोळा टन साहित्य जमा झाले. यात 30 प्रकारचे जीवनावश्यक वस्तूंची 1 हजार कुटुंबासाठी 1 हजार किट तयार करून पाठविण्यात आले आहे.
या प्रसंगी प्रास्ताविक राजाभाऊ पाथ्रडकर संचालन ऍड.निलेश चौधरी, आभार प्रदर्शन- सुधीर साळी यांनी केले. या कार्यक्रमानंतर आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार व उपस्थितांनी हिरवी झेंडी दाखवून जीवनावश्यक वस्तूंच्या भरलेल्या ट्रकची रवानगी केली. या प्रसंगी रोटरी क्लबचे सर्व सदस्य उपस्थित होते. तसेंच बहुसंख्य वणीकर दान दाते व जनता, विविध संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते. सदर साहित्य प्रत्यक्ष गरजूंपर्यंत पाहोचविण्यासाठी वणी वरून रोटरी चे ऍड. निलेश चौधरी, निकेत गुप्ता, सुधीर साळी, विनोद बाजोरिया, किसन जैन, राजेश राठी, निकुंज अटारा, राजू गव्हाणे, नियोजित ठिकाणी गेले आहेत.