रोटरी क्लब तर्फे स्वातंत्र्य दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

जितेंद्र कोठारी, वणी: रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड वणीतर्फे स्वातंत्र्य दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन कऱण्यात आले. मुलांचा उत्साह वाढवण्यासाठी टिळक चौक येथे सुमारे 2500 विद्यार्थ्यांना स्केचपेन व बलून वाटण्यात आले. रोटरी क्लबचे अध्यक्ष आशिष गुप्ता व सचिव अश्विन कोंडावार यांच्या नेतृत्वात हा कार्यक्रम पार पडला.

एसबी लॉन येथे देशभक्तीपर गितांवर आधारीत आंतरशालेय नृत्य स्पर्धा घेण्यात आली. प्राथमिक शाळेच्या गटात पहिले बक्षिस बालविद्या शाळा, द्वितीय मार्कंडेय पोद्दार स्कूल तर तिसरा क्रमांक वणी पब्लिक स्कूलला मिळाला. तर माध्यमिक शाळेच्या गटात प्रथम बक्षिस एसपीएम, संताजी इंग्लिश मीडियम स्कूल द्वितीय तर वणी पब्लिक स्कूलला तृतीय बक्षिस मिळाले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी माजी अध्यक्ष अंकुश जयस्वाल, प्रकाश कावडे, अचल जोबनपुत्रा, श्रयस निखार, नवीन जैन, सुनील चिंडालिया, लक्ष्मण उरकुड़े, मयूर अग्रवाल, हिमांशु बत्रा, मुकेश काठेड, कौस्तुभ लाखे, पुनीत बत्रा, मयूर गेडाम, शुभम जैन, मनीष बत्रा, जितेंद्र फेरवानी यांच्यासह सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.

वणी पब्लिक स्कूलमध्ये विजेत्या चमुचा सत्कार

वणी पब्लिक स्कूलमध्ये विजेत्या चमुचा सत्कार
नृत्य स्पर्धेत गट अ व गट ब या दोन्ही विभागात वणी पब्लिक स्कुलच्या चमूने तृतीय क्रमांक पटकावला. त्यानिमित्त शाळेत या चमुचा सत्कार करण्यात आला. मुलांना शिक्षिका शुभांगी बल्की, प्रनोती खडसे, वंदना बाविस्कर, अर्चना पाटील यांनी मार्गदर्शन केले. संस्थेचे सचिव ओमप्रकाशजी चचडा तसेच प्राचार्या ज्योती राजूरकर यांनी विजेत्या चमूचे कौतुक केले.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.