संतोष पाचभाई: हळद झाली… नवरी नवरदेव नटले… हळद झाली… कपल एन्ट्री झाली… वरमाला झाली… कन्यादान, सप्तपदी, फेरे ही झाले… एकीकडे हे सर्व विधी सुरू होते तर दुसरीकडे हे सर्व सिनेमॅटिक पद्धतीने कॅमे-यात कैद कसे करायचे याचे प्रशिक्षण सुरू होते. वणीतील बाजोरिया लॉन येथे शनिवारी 24 व 25 सप्टेंबर रोजी सिनेमॅटोग्राफी वर्कशॉप पार पडले. या शिबिरात परिसरातील व्हि़डीओग्राफर/फोटोग्राफर यांना पहिल्यांदाच या प्रकारचे उच्च दर्जाचे व सिनेमॅटिक पद्धतीचे प्रशिक्षण मिळाले. वणीतील साई व्हि़डीओ व्हिजन द्वारा या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध वेडिंग सिनेमॅटोग्राफर अमोल पाटील व राहुल पाटील (अल्टिमेट आर्ट स्टुडिओ, नाशिक) यांनी शिबिरार्थ्यांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाला सकाळी 11 वाजता नटराज पुजनाने सुरूवात झाली. यावेळी भूषण स्टुडिओ, वरोराचे संचालक जितेंद्र मत्ते हे प्रमुख पाहुणे होते. मार्गदर्शकांचे व प्रमुख पाहुण्यांच्या स्वागतानंतर वर्कशॉपला सुरूवात झाली. पहिले सत्र हे कॅमेरा, लेन्स संदर्भात झाले. दुस-या सत्रात सिनेमॅटिक लायटिंग बाबत प्रशिक्षण देण्यात आले. तिसरे सत्र हे गिम्बल मुव्हमेंट वर होते. पहिल्या दिवशी शिबिरार्थ्यांना केवळ सर्व माहिती देण्यात आली नाही, तर त्यांच्याकडून याचे प्रॅक्टिकलही करून घेण्यात आले.
रविवारचा संपूर्ण दिवस हा लाईव्ह वेडिंगच्या डेमॉस्ट्रेशनसाठी राखीव होता. या दिवशी हळद, कॉस्चुम, आउटफीट शुट, गेटिंग रेडि शॉट, बारात, कपल एन्ट्री, वरमाला, कन्यादान, सप्तपदी, फेरे, कपल शुट इत्यादींचे सिनेमॅटिक पद्धतीने शुटिंग कशी करायची याबाबत प्रशिक्षण देण्यात आले. तसेश शिबिरार्थ्यांकडून याचे लाईव्ह प्रॅक्टिकल करून घेण्यात आले. संध्याकाळी 7 वाजता प्रमाणपत्र वितरणाने शिबिराची सांगता झाली. या शिबिरात वणी, तालुक्यातील ग्रामीण भाग, वरोरा, भद्रावती, अर्जुनी मोरगाव, माहूर, इत्यादी ठिकाणाहून शिबिरार्थी आले होते.
लवकरच दोन दिवशीय फोटोग्राफी वर्कशॉप – प्रशांत झाडे
पहिल्यांदाच वणीत असा कार्यक्रम होणार असल्याने याला प्रतिसाद मिळणार की नाही याची शास्वती नव्हती. मात्र लोकांनी शिबिराला भरभरून प्रतिसाद दिला. हा प्रतिसाद बघता वणीत लवकरच दोन दिवशीच फोटोग्राफी वर्कशॉपचे आयोजन करण्यात येणार आहे. याशिवाय परिसरातील कोणत्याही प्रोफेशनल फोटोग्राफर, व्हिडीओग्राफर यांना कॅमेरा, लेन्स, परचेस इत्यादी संबंधी माहिती हवी असल्यास त्यांनी नि:संकोच आमच्याशी संपर्क साधावा.
– प्रशांत झाडे, संचालक साई व्हिडीओ व्हिजन
View this post on Instagram
View this post on Instagram
Comments are closed.