साकेत भुजबलराव उबाठाच्या वणी विधानसभा सोशल मीडिया प्रमुखपदी
पक्षाच्या विचारांचा प्रसार करण्यासाठी प्रयत्नशील राहणार - साकेत
बहुगुणी डेस्क, वणी: शिवसेना उबाठाचा वसंत जिनिंग येथे दि. 9 ऑगस्ट 2025 रोजी नवनियुक्त पदाधिकारी पदभार मेळावा पार पडला. या मेळाव्यात साकेत अविनाश भुजबलराव यांची वणी विधानसभा (वणी, झरी, मारेगाव) सोशल मीडिया प्रमुखपदी नियुक्ती जाहीर झाली. या प्रसंगी आमदार संजय देरकर यांच्या हस्ते त्यांना नियुक्ती आदेश व पदभार प्रदान करण्यात आला.
जिल्हाप्रमुख संजय निखाडे यांच्या आदेशानुसार झालेल्या या नियुक्तीत साकेत यांच्यावर पक्षाची डिजिटल ताकद वाढवणे, जनतेशी सशक्त नाते जोडणे आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या 80% समाजकारण, 20% राजकारण या मंत्राला अमलात आणण्याची जबाबदारी सोपविण्यात आली. साकेत हे नवउदयमान नेतृत्व म्हणून उदयास येत असून, त्यांची युवा पिढीतील एकनिष्ठता, सोशल मीडियावरील प्रभावी मांडणी आणि जनतेच्या प्रश्नांवर आक्रमक भूमिका यामुळे त्यांची निवड झाली.
नियुक्तीचे श्रेय साकेत यांनी आमदार संजय देरकर, जिल्हाप्रमुख संजय निखाडे, वणी विधानसभा प्रमुख सुनिल कातकडे, उपजिल्हाप्रमुख दिपक कोकास आणि तालुका-उपतालुका प्रमुखांना दिले. नियुक्ती प्रसंगी कामगार सेनेचे राज्य कार्याध्यक्ष अविनाश भुजबलराव, जिल्हा समन्वयक सुधीर थेरे, युवासेना उपजिल्हा प्रमुख अंजिक्य शेंडे, शिवसेना शहर सचिव अजय चन्ने, गणपतभाऊ लेडांगे, सामित भुजबलराव, राहुल कोलते यांच्यासह आजी-माजी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नियुक्तीनंतर साकेत भुजबलराव यांनी सांगितले, “उद्धवसाहेब ठाकरे, आदित्यसाहेब ठाकरे आणि आमदार संजय देरकर यांच्या नेतृत्वाखाली वणी विधानसभेतील नागरिकांचा आवाज बुलंद करून पक्षाच्या विचारांचा प्रसार करण्यासाठी मी प्रयत्नशील राहणार आहे.” साकेत भुजबळराव यांच्या निवडीमुळे त्यांच्यावर सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत असून याबाबत शिवसैनिक व उबाठा समर्थकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.



Comments are closed.