वणीत देशभक्तीचा जागर! 14 ऑगस्ट रोजी “तिरंगा रॅली”

स. 9.30 वाजता शासकीय विश्रामगृह येथून रॅलीला सुरूवात

पुरुषोत्तम नवघरे, वणी: नागरिकांमध्ये आणि विशेषतः तरुण पिढीमध्ये देशभक्तीची भावना रुजावी, या उदात्त हेतूने वणीतील समस्त देशभक्त नागरिकांच्या सहभागाने दिनांक १४ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ९:३० वाजता “तिरंगा रॅली”चे आयोजन करण्यात येत आहे. ही रॅली पूर्णपणे बिनराजकीय असून, कोणत्याही राजकीय पक्षाचे बॅनर किंवा झेंडे न लावता केवळ वणीकर नागरिक म्हणून आयोजित केली जात आहे.

या भव्य रॅलीत शहरातील सर्व सामाजिक संस्था, शैक्षणिक संस्थांचे विद्यार्थी-विद्यार्थिनी तसेच विविध धार्मिक आणि सांस्कृतिक संघटना सहभागी होणार आहेत. ही रॅली पायी रॅली (पदयात्रा) स्वरूपाची असून, वणी तालुक्यातील सर्व नागरिक आणि संस्थांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

रॅली विश्रामगृह येथून सुरू होऊन छत्रपती शिवाजी महाराज चौक, खाती चौक, महात्मा गांधी चौक, गाडगे बाबा चौक, काठेड ऑइल मिल चौक, सर्वोदय चौक, रविंद्रनाथ टागोर चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक या मार्गाने जाणार असून टिळक चौक येथे रॅलीची सांगता होणार आहे..

Comments are closed.