साखरा (दरा) व साखरा (पोड) येथील शेकडो तरुणांचा काँग्रेसमध्ये प्रवेश
वामनराव कासावार यांच्या नेतृत्त्वावर विश्वास ठेवत प्रवेश
पुरुषोत्तम नवघरे, वणी: साखरा (दरा) व साखरा (पोड) येथील शेकडो तरुणांनी वामनराव कासावार यांच्या नेतृत्त्वावर विश्वास ठेवत काँग्रेस पक्षात प्रवेश केला. सोमवारी दिनांक 16 सप्टेंबर रोजी हा पक्ष प्रवेश पार पडला. काँग्रेसचे राज्य कार्यकारिणी सदस्य डॉ. महेंद्र लोढा यांच्या पुढाकारातून हा पक्ष प्रवेश झाला. केवळ काँग्रेस हेच सर्वसामान्यांचे, दिन दुबळ्यांचे, आदिवासींचे हित साधू शकते. त्यामुळे वामनराव कासावार यांच्या नेतृत्त्वावर विश्वास ठेवत पक्ष प्रवेश करीत आहोत, अशी प्रतिक्रिया यावेळी युवकांनी दिली. यावेळी बोलताना वामनराव कासावार म्हणाले की भाजप संविधान संपवण्यासाठी निघाले आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या हक्कावर गदा येत आहे. एकीकडे शेतमालाला भाव नाही तर दुसरीकडे बेरोजगारी दिवसेंदिवस वाढत आहे. काँग्रेस हीच देशाला तारु शकते हे वारंवार सिद्ध झाल्याने तरुणांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. असे मनोगत त्यांनी व्यक्त केले. यावेळी डॉ. मोरेश्वर पावडे, घनश्याम पावडे, ओम ठाकूर, राजू कासावार, मंगल मडावी, अशोक पांडे, रवि देठे, प्रवीण आत्राम, गजानन नांदेकर इत्यादीची प्रमुख उपस्थिती होती.
Comments are closed.