ज्योतिबा पोटे, वणी: गेल्या सहा महिन्यांपासून वणी बाजार समिती अंतर्गत येणारे अडते विविध मागण्यांसाठी संपावर गेले आहे. त्यामुळे वणी बाजार समिती परिसरात शुकशुकाट दिसून येत आहे. त्यातच वणी शहरात व शहरालगतच्या विविध ठिकणी अनधिकृतरीत्या वजनकाटे लाऊन अडते शेतमालाची खरेदी करीत आहे.
वणी तेथील नांदपेरा रोड वरील लॉयन्स कॉन्व्हेंट परिसरात एका झाडाखाली एक इसम अनधिकृतरित्या सोयाबीन खरेदी करीत असताना संभाजी ब्रिगेडचे जिल्हा अध्यक्ष अजय धोबे यांना निदर्शनास आले. त्यांनी त्वरित संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकार्यांना फोन करून घटना स्थळावर बोलवले. सदर सोयाबीन खरेदी करीत असलेल्या स्थळावर जाऊन धाड टाकली.
तेथे गावातील शेतक-यांचे सोयाबीन कमी दरात खरेदी करीत असल्याचे आढळले. संभाजी ब्रिगेडने ती खरेदी त्वरित बंद करून बाजार समिती वणीचे सचिव अशोक झाडे यांना भ्रमणध्वनी वरून सम्पर्क केला. त्यांना घटना स्थळावर बोलवले असता त्यांनी येण्यास नकार दिला. पण सदर इसमाविरुद्ध आम्ही 2 ते 3 दिवसात कार्यवाही करू असे वेळकाढू उत्तर दिले.
सदर ठिकाणी संभाजी ब्रिगेडचे जिल्हा अध्यक्ष अजय धोबे, तालुका अध्यक्ष विवेक ठाकरे, शहर अध्यक्ष अभय पानघाटे व कार्यकर्ते उपस्थित होते.