समता सैनिक दलाचे विहार जोडो अभियान सायकल मार्च

सकाळी 8 ते संध्याकाळी 4 पर्यंत चालणार मार्च

0

विलास नरांजे, वणी: समता सैनिक दल युनिट वणी व्दारा रविवारला आयोजित विहार जोडो अभियान अंतर्गत सायकल मार्च आयोजित करण्यात आला आहे. सकाळी 8 वाजता सम्राट अशोक नगर बुद्ध विहारापासून या मार्चला सुरूवात होत आहे. तर रेल्वे स्टेशन कॉलनीत या सायकल मार्चचा समीरोप होणार आहे. भिमा कोरेगाव विजयदिन द्विशताब्दी मिशन अंतर्गत या विहार जोडो हे अभियान राबवण्यात येत आहे.

Podar School 2025

कसा आहे मार्ग ?
सायकल मार्च सकाळी 8.00 वाजता सम्राट अशोक नगर बुध्द विहारापासुन सुरू होऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक – रंगनाथ नगर – लालगुडा – लालगुडा(नवीन) – पंचशिल नगर – छोरीया ले आऊट – वासेकर ले आऊट – भिमनगर – दामले फैल – गायकवाड फैल – मनीषनगर – रवीनगर – विठ्लवाडी – रेल्वे स्टेशन कॉलनी येथे साय.4.00 वा. समारोप होणार आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

सायकल मार्च आपापल्या वस्तीत पोहोचताच धम्मध्वजाजवळ उपस्थित राहून सायकल मार्चचे स्वागत करावे असे आवाहन समता सैनिक दलाचे मार्शल समृध्द तेलंग यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.