परसोडा, सिंधीवाढोना व नेरड येथून रेतीची खुलेआम चोरी
काही कर्मचारी बनले रेती तस्करांचे गुप्तहेर
सुशील ओझा, झरी: तालुक्यातील परसोडा घाटावर पैनगंगा नदीच्या पात्रातून तसेच सिंदीवाढोना व नेरड येथील नाल्यातून लाखो रुपयांची रेतीचोरी सुरू असून याकडे महसूल व पोलीस विभाग जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. या रेती चोरी प्रकरणी महसूल विभागाचे कर्मचारीच तस्करांचा गुप्तहेर बणून काम करत असल्याने रेती तस्करांचे चांगलेच फावत आहे तर शासनाला मात्र चुना लागत आहे.
मुकुटबन येथून दीड किमी अंतरावर असलेल्या परसोडा घाटातून मुकुटबन येथील 3 व पिंपरड (वाडी) येथील दोन ट्रॅक्टर चालक रात्रभर ट्रॅक्टरने पैनगंगा नदी पत्रातील कोट्यवधींची रेती चोरी करून 5 ते 6 हजार रुपये ब्रासने विक्री करीत आहे. याला सर्वस्वी जवाबदार महसूल व पोलीस विभाग आहे. रेती चोरट्या सोबत पोलीस यांचे अर्थपूर्ण मधुर समंध असल्यानेच रेती चोरी वाढत असल्याचा आरोप होत आहे.
रेती तस्करांचे गुप्तहेर बनणा-यांना धाबा-हॉटेलवर ओल्या पार्ट्या दिल्या जात आहे. याशिवाय जे कुणी पार्टीला येत नाही त्यांना चिकन-मटणचे डब्बे तसेच बिर्याणीचे डब्बे पार्सल दिले जात असल्याची खमंग चर्चा आहे. त्यामुळेच प्रशासनाला एकही ट्रॅक्टर रेतीची चोरी करताना दिसत नसल्याचे बोलले जात आहे.
मुकुटबन गावातच पटवारी व मंडळ अधिकारी यांची नियुक्ती असून यांनाही चोरोची रेती करणारे ट्रॅक्टर दिसत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. रात्री १० ते पहाटे ६ वाजेपर्यंत बिनधास्त रेतीचोरी करीत असताना सगळेच आधल्याचे सोंग घेऊन बसून आहे. तसेच शिंदीवाढोना साखरा व मुकुटबन येथील ११ ट्रॅक्टर द्वारे हेच चोरटे नेरड व शिंदीवाढोना येथील नाल्यातून एक दिवस आड रात्री १२ वाजेपासून पहाटे ६ वाजेपर्यंत रेती चोरी करून मुकुटबन अडेगाव तेजापूर व इतर ठिकाणी आर्डर प्रमाणे रेती टाकतात. तर दोन रेती तस्कर कोसारा मार्गावर व हिवरदरा जवळ रेतीचा साठा करीत असल्याची माहिती मिळाली आहे.
दोन दिवसांपूर्वी परसोडा घाटावर रेतीचोरी करून नेत असतांना तहसीदार येत असल्याचा फोन आल्याने एका रेती तस्कराने ट्रॅक्टर खाली करून पळाला तर एका तस्कराचे ट्रॅक्टर फसल्याने त्याची चांगलीच घाबरगुंडी उडाली. त्या दिवशी दोन रेती चोरट्याने प्रत्येकी ६ तर एकाने ५ ट्रॅक्टर प्रमाणे १७ ब्रास रेती चोरी केली.
मुकुटबन व पिंपरड येथील रेती चोरट्याचे समंध महसुलच्या अधिकाऱ्यांच्या चालका सोबत असल्याने तो चालक या चोरट्यांना अधिकारी येत असल्याची माहिती आहे. त्यामुळे महसूलच्या अधिकारी यांना या चोरट्यांना पकडणे कठीण झाले आहे. पोलीस, तलाठी, मंडळ अधिकारी व अधिकारी यांचा चालक यांच्या मिलीभगत मुळे रेती चोरट्यांचे चांगलेच फावत आहे.
मुकुटबन पिंपरड साखरा, शिंदीवाढोना येथील ११ रेती चोरटे असून याबाबत पोलीस व महसुलाच्या अधिकारी व कर्मचारी याना माहिती असूनसुद्धा कोणतीही कार्यवाही नाही यांच्या समोरून ट्रॅक्टर भरून जात असला तरी पाहण्याची हिम्मत करीत नाही. कारण गुप्तहेरांना मिळणारी आर्थिक मदत व ओल्या पार्टीत एवढे बुजले की त्यांना काहीच दिसत नसल्याचे चित्र आहे. तरी जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी लक्ष घालून महसूल व पोलीस विभागांना आदेश देऊन सदर रेती चोरट्यावर कठोर कार्यवाही करण्यास भाग पडावे अशी मागणी होत आहे.