वागदरा येथे सुबह ‘शाम’ रेती तस्करी

थेट नदीतून रेतीचा उपसा करण्याची तस्कराची मजल

0

विवेक तोटेवार, वणी: तालुक्यातील वागदरा येथे राहणाऱ्या एका रेती तस्कराने नवीनच शक्कल शोधून काढली आहे. यात नाही, नदीचा घाट नाही, शिवाय लिलाव नसताना थेट गावातून जाणाऱ्या नदीतूनच रेतीचा उपसा सुरू केला आहे. तस्कराने रेती काढून त्याचे मोठमोठे ढिगारे लगतच ठिकठिकाणी साठवून ठेवले आहे. यामुळे महसूल विभागाच्या लाखो रुपयांच्या महसुलावर पाणी फिरत आहे.

वणीपासून अगदी हाकेच्या अंतरावर वागदरा हे गाव आहे. या गावात माजी लोकप्रतिनिधी राहिलेला एक इसम गेल्या अनेक वर्षांपासून रेतीचा व्यवसाय करीत आहे. या रेती’ व्यवसायाला आपल्या राजकीय जोराच्या बळावर व शासकीय यंत्रणेला हाताशी धरून थेट गावातून गेलेल्या नदीतून रेती तस्करी सुरू केली आहे. ही तस्करी इतकी बिनदिक्कत सुरू आहे की अवैधरित्या उपसा केलेल्या रेतीचा साठा देखील तिथेच करून ठेवला आहे.

वागदरा येथून रोज 8 ते 10 रेतीचे ट्रॅक्टर निघतात. 8 हजार या मार्केट रेटनुसार सुमारे 5 ते 8 लाख रुपयांची रुपयांची उलाढाल महिन्याला होते. बिनदिक्कत चालणा-या या कामाला एका अधिका-याची सुबह ‘शाम’ पाठबळ असते. हा प्रकार गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू आहे. गावातील नागरिकांना या अवैध कारभाराबाबत चांगली कल्पना आहे. मात्र तस्कराचे राजकीय वजन राजकीय केनेक्शन यामुळे कुणी तक्रार करण्यास पुढे येत नाही. त्यातच तस्कराने प्रशासकीय यंत्रणेतील काही भ्रष्ट कर्मचा-यांना हेरल्यामुळे तस्करीचा मार्ग मोकळा झाला आहे. यात केवळ महसूल विभागाचेच आर्थिक नुकसान नाही तर पर्यावरणाचेही मोठे नुकसान होत आहे.

तस्करीसाठी लावलेली सर्व फिल्डिंग योग्य लागल्याने रेती तस्कराची हिम्मत इतकी वाढली आहे की आधी लपून चालणारा रात्री चालणारा हा प्रकार आता भर दिवसाही सुरू आहे. भर दिवसा रेतीचा उपसा होत असतानाही याकडे मात्र संबंधीत क्षेत्रात कार्यकर कर्मचारी मात्र डोळे बंद करून असल्याचे दिसत आहे. तस्करीसाठी वापरण्यात येणा-या अवजड वाहनांमुळे गावातील मुख्य रस्ता व शेतात जाणारी पायवाटही पूर्णपणे अस्तव्यस्त झाली आहे.

तस्करीच्या रोगावर ‘डॉक्टर’ करणार ट्रिटमेन्ट ?
वागदरा परिसरात रेती तस्करीचा रोग चांगलाच फैलावत आहे. त्यातच एक अधिकारीही सध्या भ्रष्टाचाराच्या आजाराने चांगलाच ग्रस्त आहे. गावठी वैद्याने ही बाब हेरून तस्करीवर एक जालिम उपाय काढला आहे. अध्ये मध्ये ‘शाम’ होताच वैद्य अधिका-यावर औषधीचा गावठी उपाय करतो. औषध पाणी झाले की तस्करीला चांगलेच खत पाणी मिळते व तस्करीचा मार्ग मोकळा होतो. मात्र या गावठी वैद्याचा व सुबह शाम भ्रष्टाचाराच्या कुरणात चरणा-या अधिका-यावर वरिष्ठ ‘डॉक्टर’ यांनी ट्रिटमेन्ट करणे गरजेचे आहे.

वागदरा इथे चालणा-या रेती तस्करीबाबत संबंधीत कर्मचा-यांनाही कल्पना असल्याची माहिती आहे. मात्र शासनाला चुना लागत असल्याचे समोर दिसत असतानाही या भागातील महसूल विभागाचे कर्मचारी डोळे झाकून का आहेत हे एक न उलगडलेलं कोडं आहे. उपविभागीय अधिकारी डॉ. शरद जावळे यांनी या प्रकरणी लक्ष घातल्यास यात कुणाचे हात रेतीने माखलेले आहे हे स्पष्ट होऊ शकते.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.