रेती तस्करीवरील कार्यवाही संशयाच्या भोव-यात
चालकांवर कार्यवाही करून मालकांना अभय देण्याचा आरोप
सुशील ओझा, झरी: झरी जामणी तालुक्यातील धानोरा (लिंगटी) याा गाव परिसरातील पैनगंगा नदी पात्रातून अवैधरित्या रेती तस्कर करणारे तेलंगणा प्रांतातील २४ ट्रॅक्टर पकडण्यात आले होते. सरपंच व धानोरावासीयांनी ही कारवाई केली होती. या कारवाईत 31 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र यात फक्त चालकांवर कारवाई करण्यात आली असून ट्रॅक्टर मालकांना यातून वगळण्यात आले आहे. त्यामुळे ही कारवाई संशयाच्या भोव-यात सापडली आहे.
रेती तस्करी प्रकरणी प्रत्येक ट्रॅक्टरला 1 लाख 15 हजार दंड आहे. त्यामुळे सर्व तस्करांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. त्यांच्यावर चोरीचा गुन्हा देखील दाखल करणे गरजेचे होते. मात्रर महसूल विभागाचे वरीष्ठ अधिकारी वेळेवर न पोहोचल्याने कार्यवाहीस विलंब झाला. रात्री 11 वाजताच्या दरम्यान 24 ट्रॅक्टर चालक व 9 मालक अशा एकूण 33 जणांवर चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. 24 ट्रॅक्टरचालक पैकी 3 ते चालक हे चालक मालक आहेत. मात्र केवळ 9 मालकांवर कार्यवाही करण्यात आली. त्यामुळे चालकांना अडकवून मालकांना वाचवण्यासाठीचा प्रयत्न तर होत नाही ना अशी चर्चा परिसरात रंगत आहे.
तालुक्यातील दुर्भा, हीरापुर, परसोड़ा, कंमळवेल्ली, खातेरा, मुंजाला, येड़शी, या पैनगंगा नदीच्या पात्रा्त जेसीबीने रस्ता तयार करून खुलेआम दिवस रात्र ट्रॅक्टरने रेती तस्करी सुरु आहे. याबाबत वणी बहुगुणीने वारंवार वृत्त प्रकाशित केले आहे. मात्र तरीही महसूल विभाग आपले ‘अर्थ’पूर्ण संबंध जोपासत त्याकडे डोळेझाक करीत आहे. ज्यामुळे लाखो रूपयांचा महसूल बूड़त आहे.
वरील नदीपात्रतुन रेती तस्करी करण्यात मुकुटबन, मांगली, अडेगाव, लहान पांढरकवडा, अडकोली, पाटण, कोसारा, अर्धवन, झरी व इतर गावतील ३० ते ३५ ट्रैक्टर आहे. या रेती तस्करांवर महसूल विभाग कार्यवाही केव्हा करणार असा संतप्त प्रश्न जनता करीत आहे. तेलंगणातील रेती तस्करां जवळ महाराष्ट्रातील महसूल विभागातील नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी, पटवारी व कोतवालांचे मोबाइल नंबर आहेत. त्यावरून महसूल विभाग संशयाच्या भव-यात आला आहे. त्यामुळे कुणालाही अभय न देता रेती तस्करांवर कठोर कार्यवाही करण्याची मागणी परिसरातून होत आहे.