शिवसेनेतर्फे शासकीय कर्मचा-यांना सॅनिटायझरचे वाटप
तहसिल कार्यालयात कर्मचा-यांना साहित्याचे वाटप
सुशील ओझा,झरी: सध्या कोरोनामुळे आलेल्या आपत्तीमध्ये शासकीय कर्मचारी दिवसरात्र एक करून आपत्ती व्यवस्थापनाचे कार्य करीत आहेत. त्या कर्मचा-यांना कोरोनापासून संसर्ग होऊ नये यासाठी शिवसेना झरी तालुक्यातर्फे सोमवारी सॅनिटायझर व डेटॉल साबणाचे वाटप करण्यात आले. यावेळी शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष विश्वास नांदेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
झरी तहसील कार्यालयात तहसीलदार जोशी, नायब तहसीलदार रामचंद्र खिरेकर, पाटण पोलीस स्टेशनचे ठाणेदार अमोल बारापात्रे, मुकुटबन पोलीस स्टेशनचे ठाणेदार धर्मा सोनुने, झरी नगरपंचायतचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अखत्यारीत येणा-या संपूर्ण कर्मचार्यांना सॅनिटायझर व डेटॉल साबणाचे वाटप करण्यात आले.
यावेळी कृ उ बाजार समितीचे उपसभापती संदीप विंचू, युवासेनेचे प्रमुख, तालुका वैद्यकीय अधिकारी मोहन गेडाम, तहसील कर्मचारी, आरोग्य विभाग, पोलीस कर्मचारी, नगरपंचायत कर्मचारी यांच्यासह वणी विधानसभा सहसंपर्क प्रमुख संतोष माहुरे, तालुका प्रमुख चंद्रकांत घुगुल व शिवसैनिक उपस्थित होते.