सामाजिक कार्यकर्ते संजय चिंचोळकर यांचा सहकाऱ्यांसह भाजपमध्ये प्रवेश

जितेंद्र कोठारी, वणी: वणी येथील सुपरिसचि सामाजिक कार्यकर्ते व धोबी (परीट) समाजाचे नेते संजय चिंचोळकर यांनी त्यांच्या सहकार्यासह भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे वणी दौऱ्यावर आले असता त्यांच्या उपस्थितीत त्यांचा व सहका-यांचा पक्ष प्रवेश केला.

यावेळी धोबी परीट समाजाच्या युवा शाखेचे जिल्हा अध्यक्ष सारंग बिहारी यांनी सुद्धा भाजपामध्ये प्रवेश केला. तसेच जनार्दन थेटे, धोबी (परीट) समाजाचे वणीचे माजी अध्यक्ष कैलास बोबडे, वणीचे प्रसिद्ध व्यापारी राहुल चौधरी, अनिल खीरकर, विनोद चिंचोलकर, अरविंद क्षिरसागर, भरत बोबडे, राजेश बिहारी, पवन बोबडे, आकाश बिहारी, राहुल सोनटक्के इत्यादींनी पक्ष प्रवेश केला.

यावेळेस त्यांनी हंसराज अहीर व आमदार संजीव रेड्डी बोदकूरवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत भाजपा जिल्हा अध्यक्ष तारेन्द्रजी बोर्डे यांच्या मार्गदर्शनता पक्षात प्रवेश करत आहे असे विचार उपस्थितांनी व्यक्त केले. विविध समाजाच्या कार्यकर्त्यांची मोट बांधणे हेच भाजपचे ध्येय असून येत्या काळात अठरा पगड जातीतील कार्यकर्ते व तुमच्या आमच्या सारखे बहुजन कार्यकर्ते देखील पक्ष प्रवेश करतील असे मनोगत जिल्हाध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांनी व्यक्त केले.

बुकिंगसाठी पोस्टरवर क्लिक करा...

Comments are closed.