विजय चोरडिया यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

जितेंद्र कोठारी, वणी: भाजपचे नेते व सामाजिक कार्यकर्ते विजय चोरडिया यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मारेगाव, कायर व वणी येथे नेत्र चिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर होणार आहे. तर शहनाज अख्तर यांची भजन संध्या हे संपूर्ण कार्यक्रमातील प्रमुख आकर्षण राहणार आहे. जय श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सव समितीच्या वतीने हे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. 

गुरुवारी दिनांक 31 ऑगस्ट रोजी सकाळी 10 ते 4 वाजेपर्यंत मारेगाव येथील सुविधा मंगल कार्यालयात मोफत नेत्र चिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवारी दिनांक 1 सप्टेंबर रोजी कोळी समाज मंदिर, कायर येथे मोफत नेत्र चिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर होणार आहे. दोन्ही शिबिर हे धवन नेत्रालय, नागपूर यांच्या सहकार्याने होत आहे. शनिवारी दिनांक 2 सप्टेंबर रोजी श्री जैताई मंदिर, वणी येथे स 10 ते दु. 4 या वेळात सेवाग्राम रूग्णालय, वर्धा यांच्या सहकार्याने नेत्र चिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर होणार आहे.

शहनाज अख्तर यांची भजन संध्या
रविवारी दिनांक 4 सप्टेंबर रोजी वणीतील शासकीय मैदान येथे सुप्रसिद्ध भजन गायिका शहनाज अख्तर यांच्या भजन संध्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शहनाज ही मध्यप्रदेश येथील रहिवासी असून भजन गाणारी मुस्लिम गायिका म्हणून ती देशभरात प्रसिद्ध आहे. ‘मुझे चढ गया भगवा रंग’ हे तिचं गाणं चांगलंच प्रसिद्ध झालं आहे. वयाच्या 10 व्या वर्षापासून ती भजन गात आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

कार्यक्रमाला मोठ्या संख्येने हजेरी लावा – कुणाल चोरडिया
दरवर्षी प्रमाणे या वर्षीही सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मारेगाव, कायर आणि वणी येथील नेत्र चिकित्सा व मोतीबिंद शस्त्रक्रिया शिबिर होणार आहे. ज्या रुग्णांना समस्या आहे अशा रुग्णांना मोफत औषधी दिली जाणार आहे. तसेच ज्या रुग्णांना मोतीबिंदू आहे. अशा रुग्णांची शस्त्रक्रिया देखील केली जाणार आहे. परिसरातील रहिवाशांनी लाभ घ्यावा. तसेच रविवारी होणा-या भजन संध्याचा भाविकांनी व श्रोत्यांनी लाभ घ्यावा.
– कुणाल चोरडिया, श्रीकृष्ण जन्माष्टमी समिती, वणी

नोंदणी कुठे करावी?
मारेगाव येथील शिबिरात नोंदणीसाठी पंकज पिदूरकर 9689411525, सौरभ पोटफोडे 7822852794, प्रतिभा तातेड 9923380981 या क्रमांकावर संपर्क साधता येणार आहे. तर कायर येथील शिबिरासाठी कुंदन टोंगे 9922487810, सुभाष पिल्लावार 9552702064 महेश गुरनुले 7875448805 या क्रमांकावर संपर्क साधून नोंदणी करता येणार आहे. तसेच ज्यांची नोंदणी झाली नाही अशा रुग्णांना वेळेवर देखील नोंदणी करून तपासणी करता येणार आहे.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जय श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सव समिती, बजरंग दल, विश्व हिंदू परिषद, आदर्श महिला बहुउद्देशीय संस्था मारेगाव हे परिश्रम घेत आहे. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Comments are closed.