प्रचाराच्या अखेरच्या दिवशी झरी संजय देरकर यांचा झरी तालुक्यात दौरा

मुकुटबन येथे भव्य पदयात्रा, डॉ. भालचंद्र चोपणे, मंगेश रासेकर यांचा पाठिंबा

विवेक तोटेवार, वणी: प्रचाराच्या अखेरच्या दिवशी देरकर यांनी झरी तालुक्याचा दौरा केला. यावेळी मुकुटबन येथे भव्य रॅली काढण्यात आली. यावेळी येडद, अडेगाव, कोसारा, खातेरा वेडद, खडकी, अडेगाव, रुईकोट, भेंडाळा, हिरापूर, डोंगरगाव, सिंधी वाढोणा इ. गावांचा दौरा केला. गावक-यांनी वाजत गाजत संजय देरकर यांच्या ताफ्याचे स्वागत केले. तर महिलांनी औक्षण करून स्वागत केले. यावेळी देरकर यांनी शेतकरी, बेरोजगार तरुण तरुणी यांच्याशी संवाद साधला. निवडून आल्यास शेतकरी व बेरोजगारांची समस्या दूर करण्याचा प्रयत्न करणार, असे आश्वासन त्यांनी दिले.

शिवसेना (उबाठा) व महाविकास आघाडीचे उमेदवार संजय देरकर यांना सकल कुणबी समाजातर्फे जाहीर पाठिंबा देण्यात आला. रविवारी संध्याकाळी जिल्हा परिषद हनुमान मंदिराच्या सभागृहात सकल कुणबी समाजाच्या सदस्य व पदाधिका-यांची बैठक झाली. या बैठकीत चर्चेअंती सर्वानुमते महाविकास आघाडीचे संजय देरकर यांना जाहीर पाठिंबा देण्याचा निर्णय घेण्यात आला. सकल कुणबी समाजाच्या पाठिंब्यामुळे देरकर यांना बळकटी मिळाली आहे.

वणी विधानसभा क्षेत्रात शेतकऱ्यांची संख्या लक्षणीय आहे. यातील बहुसंख्य शेतकरी हे सर्व शाखेतील कुणबी समाजाचे आहे. सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. यासह बेरोजगारी, महागाई, प्रदूषण, कोळसा खाण मजुरांचा प्रश्न आहे. देरकर यांच्याकडे पक्षाची उमेदवारी आहे. विधानसभा क्षेत्रातील प्रश्न सोडवण्यासाठी ते सक्षम उमेदवार आहे. त्यामुळे पाठिंबा देत असल्याची माहिती प्रसिद्धी पत्रकातून देण्यात आली.

बैठकीचे अध्यक्ष डॉ. भालचंद्र चोपणे होते. यावेळी ऍड. पुरुषोत्तम सातपुते, कुणबी समाज संघटनेचे अध्यक्ष मंगेश रासेकर, जयसिंग गोहोकर, मोरेश्वर वासेकर, एन. डी. सोमलकर, जगदीश ढोके, पांडुरंग टोंगे, मुकुटबन येथील सुनील ढाले, ऍड. घनश्याम निखाडे, शैलेश ढोके, गुलाब आवारी, कुंडलिक ठावरी, अंबादास वाघदरकर, प्रा. अनिल डहाके, पंकज पिदूरकर, राहुल खारकर, रवींद्र गौरकार, आनंद घोटेकर, नंदकुमार भोंगळे, संजय आ, प्रकाश पाकमोडे, भाउराव पाचभाई, गजानन जीवतोडे, जी. के. टोंगे, अभय पानघाटे, सुरेश राजूरकर इत्यादींची उपस्थिती होती. या सभेचे सूत्र संचलन रुद्रा कुचनकर यांनी केले.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.