विवेक तोटेवार, वणी: बुधवार दिनांक 13 नोव्हेंबर रोजी शिवसेना (उबाठा) महाविकास आघाडीचे उमेदवार संजय देरकर यांचा नांदेपेरा-लाठी सर्कलमध्ये प्रचार दौरा झाला. त्यांनी नांदेपेरा, वांजरी, मजरा, रांगणा, शेलू, भुरकी, वडगाव, वायगाव बेसा, लाठी, निवळी, उकणी, तरोडा, बेलोरा इत्यादी गावांचा नागरिकांनी संजय देरकर यांचे स्वागत, सत्कार, फटाके फोडून व अक्षवंत करून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. तर भालर येथे मशाल रॅली काढण्यात आली. या रॅलीने चांगलेच लक्ष वेधले.
बुधवारी 13 नोव्हेंबर रोजी सकाळी 8.30 वाजता वांजरी या गावापासून प्रचाराला सुरवात झाली. क्रांतिवीर बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून आज प्रचाराला सुरवात केली. संजय देरकर येताच शिवसैनिक व गावकऱ्यांनी या ठिकाणी एकच जल्लोष करीत गावात रॅली काढली. त्यानंतर मजरा या गावात संत जगन्नाथ महाराज यांच्या मंदिरात दर्शन घेऊन संजय देरकर यांनी गावात रॅली काढली.
नांदेपेरा या गावात संजय देरकर यांचे फटक्यांची आतिषबाजी करून स्वागत करण्यात आले. यावेळी शेकडोच्या संख्येने शिवसैनिकानी त्यांची भेट घेतली व आपला पाठिंबा जाहीर केला. सेलू या गावात देरकर यांनी विक्तु बाबांचे दर्शन घेतले. भुरकी, रांगणा या गावात प्रचार ताफा पोहोचला. येथे शिवसैनिकांनी फटाके फोडून संजय देरकर यांचे स्वागत केले. यावेळी महिलांनी त्याने औक्षण करून शुभेच्छा दिल्या. त्यानंतर या गावात रॅली काढण्यात आली.
त्यानंतर वडगाव, झोला या गावात प्रचाराचा मोर्चा वळविण्यात आला. या गावात शिवसैनिक त्यांची आतुरतेने वाट बघत होते. गावात भव्य रॅली काढण्यात आली. या गावातील वृद्ध महिलांच्या समस्या जाणून घेतल्या त्यांच्यासोबत काही वेळा वार्तालाप करून त्यांना दिलासा दिला. नायगाव येथे प्रचार मोर्चा वळविण्यात आला. या ठिकाणी वृद्धांकडून आशीर्वाद घेऊन रॅलीची सुरवात करण्यात आली. संपूर्ण गावात अनेक शिवसैनिक असल्याने या गावात रॅलीचे भव्य रूप दिसून आले. कोना, सावर्ला या गावात प्रचार दौरा झाला. सावर्ला येथे संजय देरकर यांनी ऍड विनोद चोपणे यांची भेट घेतली. या गावात महेश सोमलकर यांच्यासारखे शिवसैनिक असल्याने या गावातील लोकांचा शिवसेनेवर विश्वास असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. निळापूर येथे प्रचार करण्यात आला.
सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास उकणी या गावात प्रचार करण्यात आला. या गावात शिवसैनिक बहुसंख्येने उपस्थित होते. फटक्यांची आतिषबाजी करीत संजय देरकर यांचे स्वागत करण्यात आले. तर महिलांनी औक्षण करून शुभेच्छा दिल्या. या गावात शिवसैनिकांची भव्य रॅली निघाली. या नंतर पिंपळगाव येथे रॅली काढण्यात आली. येथे दीपक मत्ते यांनी संजय देरकर यांचे जंगी स्वागत केले.
भालर येथे मशाल रॅली
भालर गावात मशाल रॅली काढण्यात आली. अनेक शिवसैनिक मशाल हातात घेऊन रॅलीत उपस्थित होते. या भालर गावात संजय देरकर यांचे फटक्यांची आतिषबाजी करीत भव्य स्वागत करण्यात आले. यानंतर बेसा, लाठी, निवळी, तरोडा, बेलोरा येथेही रॅली काढून प्रचार करण्यात आला.
प्रचार दौ-यात राजीव कासावार, संजय निखाडे, दीपक कोकस, राजू तुराणकर, अजय धोबे, प्रवीण खानझोडे, गणपत लेडांगे, शिरभाते, डॉ. जगन जुनगरी, अजिंक्य शेंडे, अखिल सातोकर, आशिष रिंगोले, दत्ता डोहे, वसंता थेटे, अनिल खाडे, संदीप बुरान, सुनील दुरुतकर, वैभव मोहितकर, सुशांत मोहितकर, प्रवीण मिलमिले, विलास गोवारदीपे, प्रमोद ताजने, नागेश वैद्य यांच्यासह शिवसैनिक व महाविकास आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते.
Comments are closed.