मारेगाव तालक्यात घोंगावले संजय देरकर यांच्या प्रचाराचे वादळ

रविवारी स. 10 वा. वणीत महारॅलीचे आयोजन, जत्रा मैदानातून होणार सुरुवात

विवेक तोटेवार, वणी: शुक्रवारी संजय देरकर यांचा मारेगाव तालुक्यात प्रचार दौरा झाला. काँग्रेसच्या नेत्या अरुणा खंडाळकर, वसंत आसुटकर, मारोती गौरकार यांच्या नेतृत्त्वात हा दौरा झाला. गौराळा, वरुड, आकापूर, लाखापूर, वनोजा देवी, हिवरा, कानडा, शिवणी, पार्डी, चनोडा, चोपण, मार्डी, पिसगाव, खैरगाव, चिंचमंडळ, कोथुर्ला, बोरी, कुंभा, बोटोणी, धरमपोड, घोगुलदहा, वागदरा, वसंतनगर, सराटी, खंडणी भुरकी (पोड), रोहपट इत्यादी गावात प्रचार दौरा झाला. पदयात्रेत मतदारांनी देरकर यांचे हार घालून तर महिलांनी औक्षण करून स्वागत केले. पदयात्रेला मोठ्या संख्येने महिलांची उपस्थिती होती. रविवारी स. 10 वाजता वणीतील जत्रा मैदान येथून देरकर यांच्या प्रचारार्थ रॅली काढण्यात येणार आहे. या रॅलीला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन महाविकास आघाडीतर्फे करण्यात आले.

सकाळी गौराळा येथून संजय देरकर यांच्या प्रचाराला सरुवात झाली. येथे पदयात्रा काढण्यात आली. त्यानंतर वरुड, आकापूर, लाखापूर येथे पदयात्रा निघाली. लाखापूर येथे देरकर यांनी गावातील तरुणांशी संवाद साधला. तर वनोजा देवी येथे शेतक-यांनी देरकर यांनी भेट घेत त्यांना शेतमालाच्या भावाबाबत चर्चा केली. हिवरा, मजरा या ठिकाणी तरुणांनी फटक्यांची आतिषबाजी करून संजय देरकर यांचे स्वागत केले. शिवानी (धोबे) येथे क्रांतिवीर बिरसा मुंडा यांच्या फलकाला अभिवादन करण्यात आले. 

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

मार्डी या गावात संजय देरकर यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून प्रचाराला सुरवात केली. पदयात्रेत गावातील कार्यकते व शिवसैनिकांनी एकच गर्दी केली होती. कुंभा या गावात संजय देरकर यांचे फटाक्याची आतिषबाजी करीत भव्य स्वागत करण्यात आले. कुंभ्याचे सरपंच अरविंद ठाकरे यांनी संजय देरकर यांचे हार घालून स्वागत केले. महिलांनी देरकर यांचे औक्षण करीत शुभेच्छा दिल्या. म्हैसदोडका येथे कॉर्नर सभेने प्रचाराची सांगता झाली.

रविवारी वणीत महारॅलीचे आयोजन
रविवारी संजय देरकर यांच्या प्रचारार्थ महारॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. स. 10 वा. जत्रा मैदान येथून या महारॅलीला सुरुवात होणार आहे. रंगनाथ स्वामी मंदिर, शर्मा चौपाटी, गाडगेबाबा चौक, गांधी चौक, खाती चौक असे मार्गक्रमण करीत टिळक चौक येथे रॅलीची सांगता होणार आहे. रॅलीला खा. संजय देशमुख व वामनराव कासावार यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

मारेगाव येथील रॅलीत महिला कार्यकर्त्या दिमन टोंगे, योगिता मोहोड, वनिता काळे यांच्यासह मारोती गौरकार, देवीदास काळे, सुनील कातकडे, संजय निखाडे, अजय धोबे, राजू तुराणकर, घनश्याम धोबे, आशिष रिंगोले, अभय पाणघाट, नीलेश रासेकर, अशोक धोबे, मारोती गौरकार, नंदू आसुटकर, अकुश माफूर, आकाश बदकी, रवी पोटे, अरुण नक्षणे, पांडुरंग लोहे, नाना डाखरे, पुरुषोत्तम बुचे यांच्यासह महाविकास आघाडीचे कार्यकते उपस्थित होते.

Comments are closed.