वामनराव कासावार यांच्या सहकार्याने मिळाली नवी ऊर्जा: संजय देरकर

संजय देरकर यांचा जोमात प्रचार, शनिवारी राजूर सर्कलमध्ये झाली सभा व रॅली

विवेक तोटेवार, वणी: वणी विधानसभा क्षेत्रात काँग्रेस पक्ष बलाढ्य आहे. महाविकास आघाडीतर्फे माझी उमेदवारी जाहीर होताच काँग्रेस पक्षाचे चांगले सहकार्य लाभत आहे. काँग्रेसचे कार्यकर्ते व नेते जोमाने काम करीत आहे. वामनराव कासावार यांच्या सारखे ज्येष्ठ नेत्यांचे सहकार्य लाभल्याने प्रचाराला नवी उर्जा मिळाली आहे. त्यामुळे यावेळी विजय सहज आणि सोपा आहे, असा विश्वास संजय देरकर यांनी राजूर येथील प्रचार सभेत व्यक्त केला. शनिवारी महाविकास आघाडी व शिवसेनेचे अधिकृत उमेदवार संजय देरकर यांचा प्रचार दौरा पार पडला. यावेळी राजूर येथे भव्य प्रचार रॅली निघाली. रॅलीनंतर प्रचार सभा झाली. यावेळी संजय देरकर बोलत होते.

शनिवारी दिनांक 9 नोव्हेबर रोजी संजय देरकर यांचा मूर्धोनी, परसोनी, सोमनाळा, निंबाळा, राजूर, मार्डी, गळेगाव, सोनापूर, मजरा या गावांचा प्रचार दौरा होता. यावेळी गावागावात प्रचार ताफ्याचे गावक-यांनी स्वागत केले. राजूर येथे येथे फटाक्यांची आतिषबाजी करीत राजूरवासीयांनी त्यांचे स्वागत केले. त्यानंतर राजूरमध्ये पदयात्रा काढण्यात आली. यावेळी ‘बटेंगे नही, जितेंगे, एक संधी संजय देरकर यांना’ अशी नारेबाजी करण्यात आली. पदयात्रेत देरकर यांनी राजूरवासीयांना बहुमताने निवडून देण्याचे आवाहन केले. पदयात्रेनंतर प्रचार सभा पार पडली.

पहिले प्रदूषण व रोजगाराचा प्रश्न सोडवणार – संजय देरकर
राजूर आणि परिसरात प्रदूषण व रोजगाराची मोठी समस्या आहे. प्रदूषणामुळे येथे मोठ्या प्रमाणात आरोग्याच्या समस्या आहे. यासह राजूर व परिसरात रोजगाराची मोठी समस्या आहे. गावातील बेरोजगार तरुणांना बाहेरगावी नोकरीसाठी जावे लागते. मात्र निवडून आल्यास सर्वप्रथम प्रदूषण व रोजगाराची समस्या सोडवणार ही माझी गॅरंटी राहील. असे आश्वासन संजय देरकर यांनी सभेत दिले.

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे कुमार मोहरमपुरी यांनी भाषणात मोदी सरकार व महायुती सरकारवर जोरदार ताशेरे ओढले. सध्या महाराष्ट्रात जे सरकार कार्य आहे ते खोक्याचं सरकार आहे. खोके देऊन विकत घेतलेले नेते सरकारमध्ये आहेत. महाराष्ट्रात सुरु होणारे सर्व उद्योग शिंदे व फडणवीस सरकारने गुजरातला नेले. एकीकडे सोयाबिनला भाव नाही. मात्र तेलाच्या किमती मात्र वाढवल्या. अशी टिका त्यांनी केली तर संभाजी ब्रिगेडचे अजय धोबे यांनी शेतक-यांच्या परिस्थितीवर भाष्य करीत आता शेतक-यांनी सरकारला खाली खेचावे असे आवाहन मतदारांना केले.

राजूरच्या सरपंच विद्या पेरकावार यांनी आपल्या भाषणात संजय देरकर यांना साथ देत असल्याचे जाहीर केले. कार्यक्रमचे सूत्रसंचालन डेव्हिड पेरकावार यांनी केले तर आभार प्रवीण खानझोडे यांनी मानले. प्रचार ताफ्यात राजीव कासावार, दिलीप परचाके, ओम ठाकूर, विद्या पेरकावार, कुमार मोहरामपुरी, अजय धोबे, प्रणिता अस्लम, उत्तम गेडाम, घनश्याम पावडे, संजय निखाडे, डेनि सॅंड्रावार, संजय निखाडे, सुनील कातकडे इत्यादींची प्रमुख उपस्थित होती. रॅलीत शिवसेनेसह काँग्रेस, माकप, संभाजी ब्रिगेडचे नेते व कार्यकर्ते तसेच देरकर यांचे समर्थक उपस्थित होते.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.