बहुगुणी डेस्क, वणी: शिवसेना (उबाठा) व महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार संजय देरकर यांच्या प्रचारार्थ गुरुवारी दिनांक 14 नोव्हेंबर रोजी वणीत जाहीर सभा होणार आहे. वसंत जिनिंग लॉन येथे संध्याकाळी 6.30 वा. ही सभा होत आहे. मा. आ. वामनराव कासावार यांच्या अध्यक्षतेत होणा-या या सभेत विदर्भातील सुप्रसिद्ध वक्ते व ज्येष्ठ संपादक बाळासाहेब कुळकर्णी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. यासह शिक्षक आमदार सुधाकर अडबाले, आ. अभिजित वंजारी, अरविंद देशमुख प्रांतीय अध्यक्ष विमाशी संघ, उत्तमराव गेडाम हे प्रमुख वक्ते राहणार आहे. या सभेला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन शिवसेना व महाविकास आघाडीतर्फे करण्यात आले आहे.
निकेश जिलठे - संपादक वणी बहुगुणी
2007 पासूून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. ग्रामीण व शहरी असा पत्रकारितेचा अनुभव. आजतक, झी, जय महाराष्ट्र, टीव्ही 9 इत्यादी आघाडीच्या टीव्ही मीडियात मुंबई येथे विविध पदावर 10 वर्ष कार्यरत. सध्या एका पीआर एजन्सीचे संचालक तसेच वणी बहुगुणी या वेबसाईटचे मुख्य संपादक. यवतमाळ जिल्ह्यातील पहिले न्यूज पोर्टल वणी बहुगुणी या स्थानिक न्यूज पोर्टलच्या माध्यमातून परिसरातील ज्येष्ठ व नव्या दमाच्या पत्रकारांसह वणी व परिसरातील बातम्या व ताज्या घडामोडी पोहोचवण्याचा एक प्रयत्न. सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक विषयावर विविध माध्यमात लिखाण. राज्यातील अनेक ज्येष्ठ नेते व मंत्री यांचे मीडिया कन्सलटन्ट म्हणूनही कार्य.
Comments are closed.