विवेक तोटेवार, वणी: शनिवार 16 नोव्हेंबर रोजी संजय देरकर यांनी झरी तालुक्यात संजय देरकर यांच्या प्रचाराचा धुराळा उडाला. माथार्जून येथे संजय देरकर यांचे घराघरातून पुष्पवर्षाव करून स्वागत करण्यात आले. तर पाटण येथे भव्य मशाल रॅली काढण्यात आली. ही रॅली संपूर्ण दिवसाच्या प्रचाराचे प्रमुख आकर्षण ठऱले. यावेळी प्रचार ताफ्याचे वामनराव कासावार व पाटण वासीयांनी वाजत गाजत व फटाक्याची आतषबाजी करीत जंगी स्वागत केले. तर झरी तालुक्यातील अनेक स्थानिक कार्यकर्त्यांनी शिवसेना (उबाठा) पक्षात जाहीर प्रवेश घेतला.
शनिवारी दिनांक 16 नोव्हेंबर रोजी झरी तालुक्यातील झमकोला येथून शिवसेना (उबाठा) महाविकास आघाडीचे उमेदवार संजय देरकर यांच्या प्रचाराला सुरुवात झाली. बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला अभिवादन करून गावात रॅली काढण्यात आली. त्यानंतर दरा, दाभाडी, बोरी पोड, मांगुर्ला येथे प्रचार दौरा झाला. प्रत्येक गावात देरकर यांचे फटाक्याच्या आतषबाजीत व पुष्पहार टाकून स्वागत करण्यात आले. मांगुर्ला येथे देरकर यांनी कार्यकर्त्यांच्या आग्रहापोटी त्यांच्या घरी भेट दिली.
अडकोली या गावात औक्षण करून महिलांनी शुभेच्छा दिल्या. पवनार येथे मंदिरात दर्शन घेऊन त्यांनी कुकुडबोरी या गावात प्रचार रॅली काढली. ल. पांढरकवडा, अर्धवन, ल. मार्की या गावात त्यांनी भेट दिली. मार्की येथील कवडू उलमाले व कवडू राऊत यांनी शिंदे गटाला रामराम करीत तर मनसेचे झरी उपतालुका प्रमुख गुलाब आवारी यांनी जय महाराष्ट्र करीत शिवसेनेत प्रवेश घेतला. दुर्गापूर येथे छ. शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून गावात प्रचाराला सुरवात करण्यात आली. या गावातील अनिल निंदेकर उपतालुका प्रमुख (शिंदे गट) यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश घेतला. झरी, को़डपाखिंडी, मांडवा या गावात देरकर यांचा आदिवासी बांधवांकडून सत्कार करण्यात आला.
माथार्जून येथे घराघरातून पुष्पवर्षाव
माथार्जुन येथे देरकर यांचे अभूतपूर्व स्वागत करण्यात आले. प्रचार ताफा पोहोचताच देरकर यांचे फटाक्याच्या आतषबाजी करीत स्वागत करण्यात आले. तर संपूर्ण गावात रॅलीवर पुष्पवर्षाव करून स्वागत करण्यात आला. कार्यकर्त्यांनी अनेक घरांच्या छतावर फुले ठेवलेली होती. माथार्जुन येथील मुस्लीम बांधवांनी संजय देरकर यांचे स्वागत केले व आपला पाठिंबा असल्याचे जाहीर केले. तर महिलांनी औक्षण करून शुभेच्छा दिल्या.
पाटण येथील मशाल रॅली ठरली लक्षवेधी
पिवरडोल येथे सरपंच सुनील निकोडे यांच्या पत्नीकडून औक्षण करून शुभेच्छा देण्यात आल्या. मांडवी, टाकळी, सतपल्ली या गावांचा दौरा करीत पाटण येथे प्रचार ताफा पोहोचला. येथे काढण्यात आलेल्या मशाल रॅलीने सर्वांचे लक्ष वेधले. संजय देरकर यांनी पदयात्रा काढीत माजी आमदार वामनराव कासावार यांच्या घरी भेट दिली. पाटण वासीयांनी वाजत गाजत व फटाक्याची आतषबाजी करीत देरकर यांचे जंगी स्वागत केले. त्यानंतर कमळवेल्ली, सुरदापूर, बैलमपूर येथे प्रचार केल्यानंतर पिंपरड या गावात शनिवारच्या प्रचाराची सांगता झाली.
प्रचार रॅलीत राजू कासावार, संजय निखाडे, सीताराम पिंगे, अभय पानघाटे, अजय धोबे, राजू येल्टीवार, प्रकाश मॅकलवार, प्रकाश कासावार, नीलेश येल्टीवार, संदीप बुरेवार, राहूल दांडेकर, नागोराव उरवते, बळी पेंदोर, संतोष कोहळे, उमारेड्डी बांजलवार, संतोष माहुरे, दुशांत उपरे, बाबाराव झाडे, सुभाष कुडमेठे, विनोद उप्परवार यांच्यासह शिवसेना व महाविकास आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते.
Comments are closed.