चणा खरेदीतील उत्कृष्ट व्यवस्थापनाबद्दल वणीतील कंपनीला पुरस्कार

रंगनाथ स्वामी फार्मर्स प्रोड्युसर कंपनीला वॅपकोतर्फे नागपूर येथे सन्मान... अध्यक्ष संजय खाडे यांच्या उत्कृष्ट व्यवस्थापनाला यश

पुरुषोत्तम नवघरे, वणी: रंगनाथ स्वामी फार्मर्स प्रोड्यूसर कंपनी लिमिटेड वणीचा नागपूर येथे पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. नागूपर वसंतराव नाईक स्मृती सभागृहात एका शानदार सोहळ्यात कंपनीच्या वतीने अध्यक्ष संजय खाडे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. विदर्भातील शेतकरी उत्पादक कंपन्यांची शिखर संस्था असलेल्या विदर्भ ऍग्रिकल्चर ऍन्ड अलाईड प्रोड्युसर कंपनी लिमिटेड (वॅपको) च्या वतीने हा पुरस्कार देण्यात आला. चणा खरेदीत उत्कृष्ट व्यवस्थापन केल्याबद्दल हा पुरस्कार देण्यात आला.

शासनाच्या किमान आधारभूत किंमत योजना अंतर्गत नाफेड मार्फत रब्बी हंगाम 2023 ची चना खरेदी करण्यात आली. खरेदी केंद्रावर शेतक-यांची गैरसोय न होता, तात्काळ शेत खात्यावर पैसे ट्रान्सफर करून उत्कृष्ट असे व्यवस्थापन केल्याबद्दल रंगनाथ स्वामी फार्मर्स प्रोड्यूसर कंपनीचा सन्मान करण्यात आला.

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून पद्मश्री डॉ. विकास महात्मे माजी खासदार राज्यसभा, व्याख्याते चंद्रशेखर भडसावळे, श्रीकांत कुवळेकर, राजेंद्र साबळे विभागीय कृषी सहसंचालक नागपूर, डॉ. अर्चना कडू प्रकल्प संचालक (आत्मा) नागपूर, प्रज्ञा गोळघाटे, रविद्र मनोहरे, एम. बी. ढवळे, वॅपकोचे संचालक राजेश उरकुडे, धनंजय उरकुडे व कंपनीचे संचालक ईश्वर खाडे आदी उपस्थित होते.

बुकिंगसाठी पोस्टरवर क्लिक करा...

Comments are closed.