वणी बहुगुणीचे वाचक आणि जाहिरातदारांना महत्त्वाची सूचना

जितेंद्र कोठारी याला रिपोर्टर टीममधून काढण्यात आल्याने याच्याशी 'वणी बहुगुणी'च्या नावे कोणताही व्यवहार करू नये

वणी बहुगुणीच्या वाचकांना महत्त्वाची सूचना

नमस्कार,
‘वणी बहुगुणी’चे सर्व वाचक आणि जाहिरातदारांना सूचित करण्यात येते की ‘वणी बहुगुणी’साठी वणी व वणी तालुक्यात बातमीदारी करणारा जितेंद्र कोठारी याला व्यावहारिक अनियमिततेच्या कारणावरून रिपोर्टरच्या टीममधून काढून टाकण्यात आले आहे. त्याने दिवाळीत ‘वणी बहुगुणी’च्या नावे मोठ्या प्रमाणात जाहिराती गोळा केल्या. नियमानुसार संपादकाला याची माहिती देणे गरजेचे असतानाही याची कुठलीही माहिती देण्यात आली नाही. ही अनियमीतता गेल्या काही महिन्यांपासून सुरू होती. अखेर त्याला दिवाळीच्या आधी ‘वणी बहुगुणी’च्या टीममधून मुक्त करण्यात आले आहे. याची सर्वांनी नोंद घ्यावी. तसेच त्याच्यासोबत ‘वणी बहुगुणी’च्या नावाने कोणताही व्यवहार करू नये.

त्याच्या कुठल्याही जाहिराती ‘वणी बहुगुणी’ने या दिवाळीत घेतल्या नसून या जाहिराती दिवाळीत ‘वणी बहुगुणी’ पोर्टलवर लागलेल्या नाही. त्यामुळे जर आपण या जाहिरातीचे पैसे दिले असल्यास, सदर पैसे तात्काळ परत घ्यावे, किंवा दिले नसल्यास पोर्टलवर जाहिरात न लागल्याने याचे पेमेंट करू नये.

भविष्यात नेहमीच आपली बातमी, इव्हेंट वणी बहुगुणी कव्हर करणार. आपली काही बातमी, इव्हेंट किंवा जाहिरात असल्यास त्याची माहिती अथवा प्रेसनोट मला थेट 9096133400 या नंबरवर किंवा ‘वणी बहुगुणी’चे अधिकृत रिपोर्टर विवेक तोटेवार (9765100974), पुरुषोत्तम नवघरे (9689181702) भास्कर राऊत (मारेगाव) यांच्या कडे पाठवावी. आपले असेच सहकार्य असू द्यावे. 💐🙏🏼

आपला
निकेश जिलठे (MCJ – Mumbai Uni.)
संपादक, वणी बहुगुणी
मो – 9096133400
Email – [email protected]

Comments are closed.