कापूस पणन महासंघाच्या संचालकपदी संजय खाडे

वणी झोन मधून दणदणीत विजय, आज दुपारी 4 वाजता टिळक चौकात भव्य सत्कार

वणी बहुगुणी डेस्क: कापूस पणन महासंघाच्या संचालकपदाच्या निवडणुकीत वणी झोनमधून संजय खाडे यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. रविवारी दिनांक 7 जानेवारी रोजी याची निवडणूक पार पडली. आज मंगळवारी दिनांक 9 जानेवारी रोजी नागपूर येथे याची मतमोजणी पार पडली. यात संजय खाडे यांना 7 मते तर प्रतिस्पर्धी शेखर धोटे यांना 3 मते मिळाली. खाडे यांची संचालकपदी निवड झाल्याने त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. आज दुपारी 4 वाजता संजय खाडे यांचे स्वागतासाठी टिळक चौकात भव्य स्वागत समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे.

महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादन पणन महासंघाच्या निवडणुकीत कापूस फेडरेशनशी संलग्नीत जिनिंग, खरेदी-विक्री संस्थांचे प्रतिनिधी यांना मतदानाचा आणि निवडणुकीत उभे राहण्याचा अधिकारी आहे. संजय खाडे हे वसंत जिनिंगचे संचालक आहे. पणन महासंघाच्या द्वारे राज्यभरात कापूस खरेदी केली जाते. त्यामुळे राज्यात पणन महासंघाचे महत्त्व मोठे आहे. संचालकपदाच्या निवडणुकीत 11 मतदार होते. यातील 10 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

दुपारी 4 वाजता स्वागत समारंभ
आज दुपारी 4 वाजता संजय खाडे यांच्या स्वागतासाठी टिळक चौकात भव्य स्वागत समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. संजय खाडे मित्र परिवार यांच्या तर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या स्वागत समारंभाला मोठ्या संख्येने हजेरी लावावी असे आवाहन करण्यात आले आहे.

राज्यात पणन महासंघात 17 संचालकासाठी निवडणूक प्रक्रिया होते. त्यासाठी 11 झोन निश्चित करण्यात आले आहे. अमरावती, अकोला, यवतमाळ, जळगाव, नाशिक, छ. संभाजी नगर, परभणी, परळी वैजनान या झोनमधून 13 संचालकांची बिनविरोध निवड झाली होती; तर वणी, वर्धा-नागपूर, नांदेड व ओबीसी राखीव अशा 4 संचालकांसाठी रविवारी निवडणूक झाली. पणन महासंघात काँग्रेसचा दबदबा राहिला आहे. लवकरच अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवड प्रक्रिया पार पडणार आहे.

 

Comments are closed.