संत गाडगेबाबा स्वच्छतेचे चालते बोलते विद्यापीठ होते -प्रा. तेलंग

0

सुरेन्द्र इखारे, वणी – संत गाडगेबाबा आपल्या लाडक्या कीर्तनातून ते समाजाला स्वच्छतेचा उपदेश करीत .स्वच्छता हा धर्म आहे , स्वच्छता तेथे आरोग्य , आरोग्य तेथे निरोगीपणा या गोष्टी सांगण्यावर भर असे म्हणून त्यांना स्वच्छतेचे चालते बोलते विद्यापीठ होते असे मत प्रा. संजय तेलंग म्हणाले यांनी व्यक्त केले. कायर येथील विवेकानंद विद्यालयात राष्ट्रसंत गाडगेबाबा यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी जेष्ठ अध्यापक अविनाश ठाकरे हे होते. प्रमुख अतिथी संस्था सचिव सतीश घुले, प्रा संजय तेलंग, मधुकर घोडमारे, कु सोनाली भोयर, हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन सुरेन्द्र इखारे यांनी केले. तर आभार रविकांत गोंडलावार यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आकाश बोरूले, दिलीप कांदसवार , सेजल वरखडे, निकिता वाढई, सुमित मांडवकर यांनी परिश्रम घेतले.               

Leave A Reply

Your email address will not be published.