विद्यार्थ्यांनी जाणून घेतली बंदूक, पिस्तूल आणि रायफलीची माहिती

ठाणेदार अनिल बेहेराणी यांचा संताजी स्कूलच्या विद्यार्थ्यांशी मुक्त संवाद

विवेक तोटेवार, वणी: दिवसेंदिवस बालगुन्हेगारी, सायबर क्राईम आणि स्त्रियांचे लैंगिक शोषण वाढत आहे. याबाबत बालक, किशोर आणि युवक बऱ्याच प्रमाणात अनभिज्ञ आहेत. व्हावी तशी जनजागृती होत नाही. म्हणूनच स्थानिक संताजी इंग्लिश मीडियम स्कूलने विशेष उपक्रम राबविला. या अंतर्गत वणीचे पोलीस निरीक्षक अनिल बेहेराणी यांनी विद्यार्थ्यांसोबत मुक्त संवाद साधला. यात त्यांनी उपरोक्त विषयांवर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं. सोबतच विद्यार्थ्यांच्या अनेक शंकांचं समाधानदेखील केलं.

पिस्तूल, बंदूक आणि रायफल हे आपल्याला फक्त चित्रपटांमधून पाहायला मिळतात. मात्र त्या कशा कार्य करतात आणि ते हाताळण्याचे काय कायदे आहेत हे त्यांनी विद्यार्थ्यांना समजून सांगितले. कोणत्या शस्त्रानं किती नुकसान होतं याचीही सविस्तर माहिती दिली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष रमेश येरणे, उपाध्यक्ष ओमप्रकाश निमकर, सचिव धनंजय आंबटकर, सहसचिव तानाजी पाउणकर, संजय पोटदुखे, शोभना गंधारे, सीमा कुरेकार यांसह शिक्षक, पालक व विद्यार्थी उपस्थित होते. संचालन शिक्षक दिकुंडवार यांनी केलं.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.