विवेक तोटेवार, वणी: सर्वोदय चौक येथील संताजी इंग्लिश मीडियम स्कूल येथे प्रजासत्ताकदिन उत्साहात साजरा झाला. झेंडावंदनानंतर देशभक्तीपर गीते गायली गेलीत. त्यानंतर विद्यार्थ्यांची प्रभातफेरी काढण्यात आली. याच सोहळ्यात स्नेसंमेलनातील गुणवंत सादरकर्त्या विद्यार्थ्यांना बक्षिसे मान्यवरांच्या हस्ते दिलीत.
प्रजासत्ताकदिनाच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी तथा संताजी ज्ञानप्रसारक मंडळाचे आजीवन सभासद बाबारावजी खंदनकर यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. त्यानंतर पुढील कार्यक्रम सुरू झालेत. गणराज्यदिनानिमित्त विद्यार्थ्यांची प्रभातफेरी निघाली. प्रभातफेरी शाळेत पोहचल्यावर इयत्ता पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांची भाषणे झालीत. विद्यार्थ्यांनी दमदार देशभक्ती गीते सादर केलीत. त्यानंतर स्नेहसंमेलन कार्यक्रमाचे बक्षीस वितरण व प्रमाणपत्र वितरित झालेत.
या कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष रमेश येरणे, सचिव धनंजय आंबटकर, तानाजी पाऊनकर, संचालक संजय पोटदुखे, दिलीप पडोळे, शोभा गंधारे, सीमा कुरेकर, प्रसन्न बुटले, विशाल लिचोडे, प्रीतम महाकारकर, अभिजित येरणे, जितेंद्र पाऊनकर, आकाश क्षीरसागर, सागर क्षीरसागर, शिक्षकवृंद, कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
Comments are closed.